Shark Tank India 2: ‘शार्क टँक इंडिया 2’ने बदललं गणेश बालकृष्णन यांचं आयुष्य; एका रात्रीत सावरला बुडणारा बिझनेस

| Updated on: Jan 12, 2023 | 8:18 AM

'शार्क टँक इंडिया 2'मध्ये गुंतवणूक मिळवण्यासाठी आलेल्या बिझनेसमनच्या कहाणीने नेटकरी भावूक; 48 तासांत घडला हा मोठा बदल

Shark Tank India 2: शार्क टँक इंडिया 2ने बदललं गणेश बालकृष्णन यांचं आयुष्य; एका रात्रीत सावरला बुडणारा बिझनेस
'शार्क टँक इंडिया 2'मध्ये आल्यानंतर उद्योजक गणेश बालकृष्णन यांचं बदललं नशिब
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: पहिल्या सिझनच्या प्रचंड यशानंतर ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. व्यवसाय, गुंतवणूक, संघर्ष यांविषयी सांगणाऱ्या या शोमध्ये दररोज नवीन कहाणी पहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया’वर आलेल्या उद्योजक गणेश बालकृष्णन यांची जोरदार चर्चा आहे. गणेश यांची कहाणी फक्त शोच्या परीक्षकांनाच नाही तर प्रेक्षकांनाही भावूक करणारी होती. मात्र शार्क टँक इंडिया या शोमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांचं नशिब रातोरात पालटलं. 48 तासांत असं काही घडलं, ज्याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती.

चमकलं बालकृष्णन यांचं नशिब

‘शार्क टँक इंडिया’मध्ये गणेश बालकृष्णन यांना परीक्षकांकडून गुंतवणूक मिळाली नाही, मात्र सोशल मीडियावरून त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला. आयआयटी आणि आयआयएम विद्यार्थी असलेल्या बालकृष्णन यांनी शार्क टँक इंडियामध्ये आपल्या कहाणीने सर्वांनाच भावूक केलं होतं. त्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘शार्क टँक इंडिया’मध्ये आपल्या बिझनेसबद्दल बोलताना बालकृष्णन यांनी सांगितलं की त्यांनी 2019 मध्ये Flatheads Shoes नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यांचा हा व्यवसाय चांगला सुरू असता, मात्र कोविड 19 ने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. हा व्यवसाय बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांत 35 लाख रुपये खर्च केले होते. शार्क टँक इंडियामध्ये ते त्यांच्या याच व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवण्यासाठी आले होते. मात्र शोमध्येही त्यांना परीक्षकांकडून मदत मिळाली नाही.

शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांकडून कोणतीच गुंतवणूक मिळाली नसली तरी बालकृष्णन यांना सोशल मीडियावरून भरपूर पाठिंबा मिळाला. याचा परिणाम असा झाला की फक्त 48 तासांच्या आता त्यांना इतके ऑर्डर्स मिळाले की त्यांची संपूर्ण इन्वेंट्री रिकामी झाली. बालकृष्णन यांनी Linkedin या ॲपवर ही आनंदाची बातमी सांगितली.

शार्क टँक इंडियामधील एक परीक्षक अनुपम मित्तल याने गणेश बालकृष्णन यांना नोकरीची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर त्यांनी नाकारली. इतकंच नव्हे तर पियुष बंसल आणि विनीता सिंह यांच्याकडून 33.3 टक्के इक्विटीसाठी 75 लाख रुपये फंडिंगची ऑफरही मिळाली होती. मात्र बालकृष्णन यांना ही ऑफर आवडली नव्हती. मात्र केवळ शोमध्ये हजेरी लावल्याने त्यांना भरपूर फायदा झाल्याचं पहायला मिळालं.