करीना कपूर हिच्यासमोरच शर्मिला टागोर यांनी सांगितला मुलगी आणि सुनेमधील ‘तो’ फरक, अभिनेत्री अवाक

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर ही कायमच सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करताना दिसते.

करीना कपूर हिच्यासमोरच शर्मिला टागोर यांनी सांगितला मुलगी आणि सुनेमधील तो फरक, अभिनेत्री अवाक
Sharmila Tagore and Kareena Kapoor Khan
| Updated on: May 09, 2024 | 3:28 PM

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान कायमच चर्चेत असते. करीना कपूर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. करीना कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. करीना कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. करीना कपूर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. करीना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहिर केल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांची दोन मुले असून तैमूर आणि जेह अली खान नाव आहे. करीना कपूर ही पती सैफ अली खान याच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. फक्त सैफ अली खान हाच नाही तर सासू शर्मिला टागोर यांच्यासोबत देखील करीना कपूर खानचे अत्यंत चांगले रिलेशन आहे.

शर्मिला टागोर या सून करीना कपूर हिच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच पोहचल्या होत्या. यावेळी सून आणि लेकीमध्ये काय फरक असतो, हे सांगताना शर्मिला टागोर या दिसल्या होत्या. शर्मिला टागोर म्हणाल्या की, आपण मुलीला लहानपणापासून बघत असतो. एखादी गोष्ट जर घडली तर ती त्यावर काय प्रतिक्रिया देणार हे आपल्याला अगोदरच माहिती असते.

हेच नाही तर मुलीच्या सर्व गोष्टींसाठी आपण अगोदरच तयार असतो. परंतू सून तुमच्याकडे अशावेळी येते, ज्यावेळी ती मोठी झालेली असते. तुम्हाला तिच्या वागण्याबद्दल खूप काही पहिले माहिती नसते. सूनेला समजून घेण्यासाठी थोडा वेळ तर तुम्हाला नक्कीच लागणार असतो. जेंव्हा एखादी नवीन मुलगी सून म्हणून तुमच्या घरात येते, त्यावेळी तुमचे देखील काही कर्तव्य असतात.

सुनेच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे आवश्यक आहे. तिला जर काही खावे वाटले तर त्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. सुनेच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ करू नये, कारण ते एक नवीन नाते असते जे तयार होण्यासाठी वेळ लागणार असतो, असेही शर्मिला टागोर यांनी म्हटले आहे. यावरूनच हे कळते की, शर्मिला टागोर आणि करीना कपूर यांच्यामध्ये कशाप्रकारचे नाते आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us