AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेच्या दरबारात…, शिवसेना कोणाची? न्यायालयातील सुनावणीनंतर शिंदे पहिल्यांदाच बोलले, मोठं विधान

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं? यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

जनतेच्या दरबारात..., शिवसेना कोणाची? न्यायालयातील सुनावणीनंतर शिंदे पहिल्यांदाच बोलले, मोठं विधान
Eknath Shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 6:48 PM
Share

आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष हा विधामंडळ पक्षापेक्षा मोठा असतो असं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेमकी कोणाची? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे, यावर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दरम्यान   यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना नेमकी कोणाची? यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर आणि विरोधकांच्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  शिवसेना कोणाची, याचं स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनेच आपल्या कौलातून दिले आहे, असे वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.

पूर्वी आमच्याकडे ४० आमदार होते, आज जनतेने ६० आमदारांना निवडून दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेवरचा विश्वास सिद्ध झाला आहे. सरकार आणि मुख्यमंत्री ‘घटनाबाह्य’ असल्याचा आरोप करणे ही विरोधकांची आता जुनी ‘रिपीट कॅसेट’ झाली आहे. जेव्हा एखादा निर्णय यांच्या बाजूने लागतो, तेव्हा हे न्यायालयाचे कौतुक करतात आणि निर्णय विरोधात गेला की न्यायव्यवस्था व निवडणूक आयोगावर आरोप करतात, असा टोला यावेळी शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असते. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दोन दिवस या प्रकरणावर सुनावणी पार पडली आहे, आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं