
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. सोनाक्षी हिने धमाकेदार भूमिका चित्रपटात केल्या. सलमान खान याच्यासोबतच्या दबंग चित्रपटातील भूमिकेमुळे तिला खास ओळख मिळाली. सोनाक्षी बिनधास्तपणे बोलताना दिसते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षीने जहीर इक्बालसोबत लग्न केले. जहीर इक्बालनेही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. जहीरचे वडील मोठे व्यावसायिक असून सलमान खान याचे अत्यंत चांगले मित्रही. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट सलमान खान यांच्याच घरी झाली होती. सोनाक्षीने अनेक वर्ष जहीरसोबतचे नाते जगापासून लपून ठेवले होते. तिने सर्वात अगोदर जहीरबद्दल आई वडिलांना सांगितले होते. शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी असून ते कायमच लेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात.
सोनाक्षी सिन्हा जहीरसोबत लग्न करत असल्याने अनेकांनी भूवया उंचावलेल्या असताना लग्नात लेकीसोबत शत्रुघ्न सिन्हा खंबीरपणे उभे होते. आता नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी जावई जहीर इक्बाल आणि मुलगी सोनाक्षी सिन्हा यांच्या नात्यावर मोठे भाष्य केले. पहिल्यांदाच ते जाहीरपणे जहीर इक्बाल याच्याबद्दल बोलताना दिसले. सोनाक्षी आणि जहीरची जोडी मला आवडते. दोघेही एकमेकांना प्रचंड मानतात. असे वाटते की, दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत.
पुढे बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, त्या दोघांचे नाते खूप म्हणजे खूप चांगले आहे. हेच नाही तर सोनाक्षीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, तिच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण आहे. सोनाक्षी कायमच सांगते की, तिच्या आयुष्यात फक्त दोनच हिरो आहेत.. सोनाक्षी सिन्हा हिच्यावर शत्रुघ्न सिन्हा खूप जास्त प्रेम करतात. लेकीच्या प्रत्येक निर्णयात ते तिच्यासोबत असतात.
शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही म्हटले होते की, माझी मुलगी आनंदी तर मी देखील आनंदी.. मला फक्त तिचा आनंद महत्वाचा आहे. जहीर इक्बालसोबतच्या लग्नाबद्दलही सोनाक्षी सिन्हा स्पष्ट बोलताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल एकमेकांसोबत कायमच मजाक मस्ती करताना दिसतात. त्यामध्येच सोनाक्षी सिन्हाला जहीर इक्बाल याने घराच्या बाहेर काढल्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.