आता फक्त घराबाहेर काढलंय हळूहळू बघ…सोनाक्षी सिन्हा हिला जहीर इक्बालने घराबाहेर काढताच थेट..
बॉलिवूड अभिनेत्री आणि शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने जहीर इक्बालसोबत लग्न केले. अनेकदा तिचे आणि जहीर इक्बालचे व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे खासगी आयुष्य एका व्हायरल व्हिडीओमुळे चव्हाट्यावर आले. अभिनेत्रीने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर काही वर्ष सोनाक्षीने त्याला डेट केले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सोनाक्षी मागील काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये हीट चित्रपट करताना दिसतंय. हेच नाही तर आपल्या चाहत्यांच्याही संपर्कात असते. मात्र, जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून तिच्यावर सातत्याने टीका केली जाते. शेवटी अभिनेत्रीने वैतागून कमेंट बॉक्सच बंद करून टाकला. शत्रुघ्न सिन्हा यांच्या लेकीने जहीर इक्बाल याच्यासोबतचे नाते अनेक वर्षे जगापासून लपवले होते. पहिल्यांदा तिने जहीर इक्बालबद्दल आई वडिलांना सांगितले.
लग्नानंतर जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा कायमच विदेशात फिरताना दिसतात. सोनाक्षी सिन्हा हिचे सासरे मोठे व्यावसायिक असून सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्या व्हिडीओमध्ये सोनाक्षीला जहीर इक्बाल याने घराबाहेर काढल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोनाक्षी कित्येक वेळ दरवाजाबाहेर उभी व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिची झालेली अवस्था पाहून जहीरला हसू आवरत नाही. जहीर इक्बाल हा घरात असताना देखील तो सोनाक्षीसाठी दरवाजा उघडत नाही. सोनाक्षी वैतागली आहे. जहीरचे हे वागणे पाहून तिला रागही येत आहे आणि हसूही. सोनाक्षीचा आवाज ऐकून नेमके काय झाले हे पाहण्यासाठी शेजारीही घराबाहेर आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोनाक्षीची मजा घेण्यासाठी झहीर इक्बाल याने असे केले.
व्हायरल व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हळूहळू बघ आता तुझ्यासोबत काय काय होते. तो आयुष्यातूनही तुला असे अचानक काढून टाकेल. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल एकमेकांसोबत मस्ती धमाल करताना कायमच दिसतात. त्यामध्येच आता त्यांचा हा धमाकेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोनाक्षी आण जहीर इक्बाल यांची जोडी अनेकांना आवडते.
