AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवडाभरातील जगाला हादरवणारी दुसरी बातमी… आणखी एका देशात तख्तापलट करण्याचा मोठा डाव; पंतप्रधान हतबल

मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी देशात तख्तापालट होण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इराण आणि गाझाला पाठिंबा दिल्याने एका ज्यू समुदाय, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि विरोधी पक्ष यामध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, सरकार पाडण्याचे हे षड्यंत्र असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

आठवडाभरातील जगाला हादरवणारी दुसरी बातमी... आणखी एका देशात तख्तापलट करण्याचा मोठा डाव; पंतप्रधान हतबल
मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहीम
| Updated on: Mar 03, 2026 | 12:49 PM
Share

आधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध पेटलं. त्यानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकलं. या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभा राहिला. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खामेनेई यांच्यासह त्यांची मुलगी, जावई आणि नातही मारली गेली. इराणचा लष्करप्रमुख आणि नवा नेताही मारला गेला. तिन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाईल आणि ड्रोनचा मारा सुरू आहे. या युद्धात अनेक देश होरपळले आहेत. दुबईवर सुद्धा इराणने हल्ला चढवला आहे. त्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. या घटना घडत असतानाच जगाला हादरवणारी दुसरी एक बातमी समोर आली आहे. केवळ इराणला पाठिंबा दिला म्हणून आमच्या देशात तख्तापालट करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा दावा एका देशाने केला असून या देशाचे पंतप्रधानही हतबल झाले आहेत.

इराणनंतर ज्यूंची नजर आता मलेशियावर आहे. इस्रायलशी संबंधित एका ज्यू संघटनेने मलेशियात तख्ता पालट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहीम यांनी तसा आरोप केला आहे. ज्यू समूदाय ब्लूमवर्गच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मीडियाने मलेशियाबाबत निगेटिव्ह बातम्या पसरवल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेचं लक्ष आमच्याकडे आकर्षित झालं आहे, असं इब्राहीम यांनी सांगत देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या कटाची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

द स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, 3 मार्च रोजी मलेशियाच्या संसदेत अनवर इब्राहीम बोलत होते. यावेळी त्यांनी माझं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. या षडयंत्रात एक ज्यू समुदाय, एक आंतरराष्ट्रीय मीडिया आणि काही विरोधी पक्षनेते आहेत. पण मी सरकार पडू देणार नाही. याची लवकरच चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषिंना अटक केल्याशिवाय राहणार नाही, असं इब्राहीम म्हणाले.

आणि ज्यू सक्रिय झाले

मी गाजा आणि इराणबाबत कडक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच ज्यू समुदायाने मला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. गाजा आणि इराणवर भाष्य करणं हा काही गुन्हा आहे का? मी त्यावर बोलतच राहणार. चौकशी नंतर सर्व दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मलेशियातील विरोधी पक्षावर खरपूस टीका केली. माझं सरकार पाडण्यासाठी आपल्या देशातील विरोधकांनी ज्यूंशी हातमिळवणी केली आहे का? मलेशियातील जनता अशा लोकांना कदापिही माफ करणार नाही, असं ते म्हणाले. मलेशियात 2020 आणि 2021मध्ये सरकार पाडण्याचा डाव रचला गेला होता आणि हा डाव उधळण्यात आला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं,.

मलेशियाबाबत घ्या जाणून…

मलेशिया हा आशिया खंडातील एक मुस्लिम देश आहे. या ठिकाणी 63.5 टक्के मुस्लिम राहतात. मलेशियात मुस्लिमानंतर बौद्धांची संख्या सर्वाधिक आहे. मलेशियात 18.7 टक्के बौद्ध राहतात. तर 6.1 टक्के हिंदू मलेशियात राहतात. याशिवाय मलेशियात ख्रिश्चन समाज 9.1 टक्के आहे.

खामेनेई यांची हत्या झाल्यानंतर त्या घटनेचा निषेध करणारा मलेशिया हा जगातील एकमेव देश आहे. सर्वात आधी मलेशियाने या हत्येचा निषेध नोंदवला होता. तसेच मलेशियाने उघडपणे इराणला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे मलेशियात ज्यूंची संख्या नगण्य आहे. त्यानंतरही अनवर इब्राहीम यांनी ज्यूंवर त्यांचं सरकार पाडण्याचा आरोप केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...