AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं तेवढं केलंय आता…, नकार देताच एक्स गर्लफ्रेंडवर भडकलेले शत्रुघ्न सिन्हा, कोणी केली पोलखोल?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यामुळे ते अधिक चर्चेत राहिले. एकदा तर एक्स गर्लफ्रेंडबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती... आता याबद्दल एका सीनियर जर्नलिस्टने मोठा खुलासा केला आहे.

जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं तेवढं केलंय आता..., नकार देताच एक्स गर्लफ्रेंडवर भडकलेले शत्रुघ्न सिन्हा, कोणी केली पोलखोल?
Shatrughan Sinha
| Updated on: Jun 13, 2026 | 9:30 AM
Share

Shatrughan Sinha On Reena Roy: बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. 80 – 90 च्या दशकात तर, अभिनेत्री रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरलेल्या. तर दुसरीकडे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय यांचे किस्से देखील अनेकांना माहिती आहे. दोघांच्या रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण एका शत्रुघ्न सिन्हा, रिना यांच्यावर प्रचंड संतापलेले आणि ते असं काही बोलून गेले… ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होता.

सांगायचं झालं तर, शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा सीनियर जर्नलिस्ट ज्योती वेंकटेश यांनी केला आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत ज्योती यांनी बॉलिवूड आणि सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्योती यांनी तो एक किस्सा देखील सांगितला, जेव्हा रीना यांनी शत्रुघ्न यांच्यासोबत काम करण्यास नकार दिलेला. ज्यामुळे शत्रुघ्न प्रचंड भडकलेले,

रिना रॉय यांना काय म्हणालेले शत्रुघ्न सिन्हा…

ज्योती सांगतात, ‘एका मॅग्झीनमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांची एक मुलाखत होता. ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आलेलं की, सिनेमात रीना रॉय अभिनेत्री असत्या, पण त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काम करण्यात नकार दिला? यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, ‘शत्रुघ्न सिन्हासोबत काम करणार नाही? असं ती कसं बोलू शकते. तिला जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं तेवढं केलंय, आता पुढे तिला स्पर्श करण्याची जराही इच्छा नाही…’, त्यांच्या अशा वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

एवढंच नाही तर, ज्योती यांनी रीना रॉय आणि शत्रुघन सिन्हा यांच्याबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला. रीना रॉय यांना सिनेमात कास्ट करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःचं मानधन देखील कमी केलेलं. पण रीना यांनी सिनेमासाठी स्पष्ट नकार दिलेला. तेव्हा अभिनेत्री सुलक्षणा यांनी सिनेमात कास्ट करण्यात आलं. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी निर्मात्यांना फोन करुन, रीना यांना सिनेमात कास्ट करा आणि हवं तर माझे पैसे कमी करा… असं म्हणालेले.

का मोडलं रीना रॉय आणि शत्रुघन सिन्हा यांचं नातं?

रीना रॉय आणि शत्रुघन सिन्हा यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणी नाही. खुद्द अभिनेत्याने सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केलेला. रीना यांना शत्रुघ्न यांच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. पण ते होऊ शकलं नाही, कारण शत्रुघ्न विवाहित होते. म्हणून, रीना यांनी शत्रुघ्न यांना वेळ देखील दिली. पण शत्रुघ्न यांनी त्यांच्या कुटुंबाची निवड केली. त्यानंतर दोघांच्या नात्याला मोठा तडा गेला. असं देखील सांगितलं जातं की, रीना रॉय आणि शत्रुघन सिन्हा तब्बल 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी