
Shefali Jariwala Death : वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी काटा लगा फेन अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र तिच्या अचानक जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शेफाली जरीवालावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतर आता शेफाली जरीवालाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे.
मृत्यूनंतर नियमाप्रमाणे शेफाली जरीवाला हिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह शेफालीच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. हा मृतदेह अगोदर तिच्या राहत्या घरी आणण्यात आला असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेफाली रोज तिच्या घरी कारमधून यायची. पण सर्वांशी मिळून मिसळून वागणारी याच शेफालीचा आज मृतदेह आल्याने त्या परिसरात राहणाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शेफाली जरीवालाच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. डॉक्टरांनी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केलेले आहे. त्यामुळे आता लवकरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समोर येणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.शेफालीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले.
शेफालीच्या अशा अकस्मात जाण्याने तिचा पती पराग त्यागी, शेफालीच आई सुनिता जरीवाला, बहीण शिवाणी जरीवाला यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लवकरच शेफालीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, शेफाली जरीवालाचे अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी ती काही औषधं घ्यायची. या औषधांमुळेच तर काही अघटित घडलं नसावं ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी ती घेत असलेले उपचार आणि तिच्या मृत्यूचा काहीही संबंध नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नेमके काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.