AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पप्पा मला वाचवा…, मुलाचे ते अखेरचे शब्द आजही कानात घुमतात; शेखर सुमन भावूक

शेखर सुमन यांनी अनेकदा आपल्या मुलाला गमावण्याचं दुःख व्यक्त केलं आहे. प्रसिद्धी, यश आणि पैसा असूनही आपल्या मुलाला वाचवता आलं नाही, ही सल त्यांच्या मनात कायम आहे.

पप्पा मला वाचवा..., मुलाचे ते अखेरचे शब्द आजही कानात घुमतात; शेखर सुमन भावूक
शेखर सुमनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 12:14 PM
Share

मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शेखर सुमन यांच्या आयुष्यात एक अशी वेदना आहे, जी काळ लोटला तरी कमी झालेली नाही. आपल्या 11 वर्षांच्या मुलाला कायमचं गमावण्याचं दुःख आजही त्यांच्या मनात घर करून आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी मुलगा आयुषच्या अखेरच्या क्षणांची आठवण सांगितली. ‘पप्पा, मला वाचवा’, अशी आर्त हाक मुलाने दिल्याचं सांगताना त्यांच्या आयुष्यातील तो काळ किती कठीण होता, याची कल्पना येते. या आठवणींनी पुन्हा एकदा चाहत्यांनाही भावुक केलं आहे.

शेखर सुमन आणि त्यांच्या पत्नी अलका सुमन यांच्या मोठ्या मुलाचं नाव आयुष होतं. आयुष अवघ्या 11 वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. त्याला हृदयाशी संबंधित एक दुर्मीळ आजार झाला होता. मुलाच्या आजाराचं निदान झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शेखर यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. देशातीलच नव्हे, तर परदेशातील डॉक्टरांकडूनही उपचार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉक्टरांनी सुरुवातीला आयुष काही महिनेच जगू शकेल, असं सांगितलं होतं. मात्र, त्याने अपेक्षेपेक्षा अधिक काळ आजाराशी झुंज दिली. त्याच्या उपचारांसाठी कुटुंबाने अनेक प्रयत्न केले, पण अखेरीस नियतीसमोर त्यांना हतबल व्हावं लागलं. 1995 मध्ये आयुषने जगाचा निरोप घेतला.

“त्यावेळी एकतर माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्यातच आम्हाला इतकी दु:खद बातमी मिळाली. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. त्याची काळजी घेण्यासाठी मी पुरेसे पैसे कमवत नव्हतो. तो काळ खूप कठीण होता. नंतर मला ‘देख भाई देख’ची ऑफर मिळाली. तेव्हा मी हे सगळं (काम) कसं केलं, हे मला अजूनही कळत नाही. त्यांनी सेटवर माझ्यासाठी एक टेलिफोन ठेवला होता, कारण मला त्याची गरज होती. जेणेकरून माझे कुटुंबीय मला सर्व घडामोडींची माहिती देऊ शकतील. जेव्हा कधी तो फोन वाजायचा, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची. काही वाईट बातमी नसावी या आशेनं मी फोन उचलायचो आणि त्यानंतर पुन्हा विनोदी भूमिका साकारण्यासाठी परतायचो. ते खूप कठीण होतं. एके दिवशी मुलाने माझा हात धरला आणि मला म्हणाला, बाबा.. मला जायचं नाहीये. कृपया वाचवा. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या आम्हा प्रत्येकाला त्याने सांगितलं की त्याचं आमच्यावर प्रेम आहे. तो देवदूतासारखा होता”, अशा शब्दांत शेखर सुमन व्यक्त झाले.

आयुषच्या अखेरच्या दिवसांची आठवण सांगताना शेखर सुमन यांनी मुलाच्या वेदना आणि स्वतःची असहायता व्यक्त केली. मुलाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्याला त्रास होताना पाहणं आई-वडिलांसाठी असह्य झालं होतं. मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याच्या वेदना कमी करता येत नव्हत्या, ही जाणीव त्यांना आतून पोखरत होती. मुलाला वाचवण्यासाठी वडील म्हणून आपण काहीच करू शकत नसल्याची भावना शेखर यांच्यासाठी अत्यंत कठीण होती. मुलाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी मोठा काळ लागला.

Follow Us
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!