1.5 लाख रुपयांचा वाइन, 920 रुपयांची चहा, शिल्पा शेट्टीच्या बास्टियनचा मेन्यू, उंचावतील भुवया

Shilpa Shetty Restaurant Menu: बॉलिवूडपासून दूर असली तरी शिल्पा शेट्टी कमावते कोट्यवधींची माया, शिल्पा शेट्टीच्या बास्टियनचा मेन्यू जाणून व्हाल अवाक्, 1.5 लाख रुपयांचा वाइन, 920 रुपयांची चहा आणि...

1.5 लाख रुपयांचा वाइन, 920 रुपयांची चहा, शिल्पा शेट्टीच्या बास्टियनचा मेन्यू, उंचावतील भुवया
फाईल फोटो
| Updated on: Oct 28, 2025 | 2:59 PM

Shilpa Shetty Restaurant Menu: अभिनेत्री शिल्पा शिट्टी फक्त तिचे सिनेमे आणि फिटनेसमुळे नाही तर, व्यवसायामुळे देखील चर्चेत असते. शिल्पा शेट्टी हॉटेल उद्योगात सक्रिय आहे. सांगायचं झालं तर, 2019 मध्ये, शिल्पाने रेस्टॉरंट ब्रँड बास्टियनचे संस्थापक रणजित बिंद्रा यांच्यासोबत भागीदारी केली आणि या लक्झरी डायनिंग ब्रँडमध्ये 50 टक्के हिस्सा विकत घेतला… आता बास्टियन फक्त मुंबईतील नाही तर, भारतीत सर्वात महागडं आणि आलिशान हॉटेल आहे.

मुंबईच्या वरळी परिसरात असलेले, Bastian At The Top हे त्याच्या आलिशान जागेसाठी, सीफूड डिशेससाठी आणि आंतरराष्ट्रीय चवींसाठी ओळखलं जातं. या रेस्टोरेंटमध्ये टेबल बूक करणं कोणत्या सेलिब्रिटी इव्हेंटपेक्षा कमी नाही. शनिवारी – रविवारी येथे लोकांची मोठी गर्दी जमते आणि रेस्टॉरंटच्या बाहेर लॅम्बोर्गिनी आणि अ‍ॅस्टन मार्टिन सारख्या लक्झरी कारची रांग दिसते.

बास्टियनचा मेन्यू

बास्टियनचा मेन्यू जाणून तुंमच्या भुवया उंचावतील. रिपोर्टनुसार, येथील बुराटा सॅलडची किंमत 1050र रुपये आहे, तर अ‍ॅव्होकाडो टोस्टसाठी 800 रुपये मोजावे लागतात. चिली गार्लिक नूडल्सची किंमत 675 रुपये आहे. चिकन बुरिटो 900 रुपयांना उपलब्ध आहे. शिवाय, तुम्हाला जास्मिन हर्बल टीसाठी 920 रुपये आणि इंग्लिश ब्रेकफास्ट टीसाठी 360 रुपये मोजावे लागतील.

बास्टियनचं वाइन सेक्शन

शिल्पाच्या हॉटेलमध्ये फ्रेंच वाईन डोम पेरिग्नॉन ब्रुट रोझची एक बाटली सुमारे 1,59,500 आहे. लेखिका शोभा डे यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, बास्टियनची कमाई एका रात्रीला अंदाजे 2 – 3 कोटी रुपये आहे. त्यांच्या मते, रेस्टॉरंटच्या दोन सिटिंग्समध्ये अंदाजे 1400 पाहुण्यांना सेवा दिली जाते, प्रत्येक सिटिंगमध्ये अंदाजे 700 लोक असतात.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी…

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि राज कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. त्यांच्यावर जुहू येथील एका व्यावसायिकाची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच, त्यांनी रेस्टॉरंट व्यवसाय वाढवण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाकारली.

दोघांना न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांनी प्रथम 60 कोटी जमा केले तरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. सांगायचं झालं तर, शिल्पा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्यान कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.