AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा दिसताच लोकं म्हणतात ही तर ‘पॉर्न किंगची बायको, मुलांना देखील…’, राज कुंद्राचं धक्कादायक वक्तव्य

Shilpa Shetty | 'अरे ही तर पॉर्न किंगची पत्नी...', फक्त शिल्पा शेट्टी हिलाच नाही तर, मुलांना देखील करावा लागतोय अनेक संकटांचा समना... राज कुंद्राचं धक्कादायक वक्तव्य

शिल्पा दिसताच लोकं म्हणतात ही तर 'पॉर्न किंगची बायको, मुलांना देखील...', राज कुंद्राचं धक्कादायक वक्तव्य
| Updated on: Feb 28, 2024 | 9:16 AM
Share

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 | अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा 2021 मध्ये पॉर्न फिल्म बनवण्याच्या आणि पॉर्न व्हिडीओ एका ॲप्लिकेशनवर अपलोड करण्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यामुळे राज याला तुरुंगात दिवस काढावे लागले होते. राज कुंद्रा याची जमिनावर सुटका झाली. पण आजही भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणार कुंद्रा कुटुंबावर होताना दिसतो. एवढंच नाही तर, आजही अनेक जण राजला ‘पॉर्न किंग’ म्हणून बोलतात.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा म्हणाला, ‘वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली कारण मी एका सेलिब्रिटीसोबत लग्न केलं. जर माझं लग्न शिल्पासोबत झालं नसतं, तर कोणाला काहीही फरक पडला नसता. मला कधीच वाटलं नाही की, मी अनेकांच्या निशाण्यावर आहे. पण माझ्या पत्नी आणि मुलांना नकोत्या प्रसंगांचा सामना करावा लागला…’

पुढे राज म्हणाला, ‘सोशल मीडियावर आजही मला ट्रोल करतात पण मी ट्रोल करणाऱ्यांनी ब्लॉक करतो. मला यासर्व गोष्टींचा फरक पडत नाही. पण माझ्या पत्नी आणि मुलांना त्रास होतो. आज जर शिल्पाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तर कमेंटमध्ये ‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’ असं ट्रोलर्स लिहितात.’

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा तुमच्या दोघांच्या नात्यावर काही परिणाम झाला. यावर राज म्हणाला, ‘जर यावर मला कोणी विचारतं तर मला महिती आहे कोणाच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवायला हवा. जेव्हा शिल्पाला केसबद्दल कळंल तेव्हा ती हासू लागली आणि म्हणाली ‘हे सत्य नाही. जर तुम्ही एका घरात राहता तर आयुष्यात पॉर्नसारखी गोष्ट आहे, याबद्दल माहिती झालं असतं…’ असं देखील राज कुंद्रा म्हणाला.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्रा आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कायम स्वतःचा चेहरा मास्कने लपवायचा.त्यामुळे तोंड लपवावं लागेल अशी कामं करायचीच का? असं म्हणून देखील राज याला ट्रोल करण्यात आलं. पण UT69 सिनेमाची घोषणा केल्यानंतर राज याने चेहऱ्यावरचा मास्क हटवला.

सिनेमात तुरुंगात राजने कसे दिवस काढले… हे दाखवण्यात आलं आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला पण चर्चा तुफान  झाली. आता राज पत्नी शिल्पा आणि कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. अनेक ठिकाणी कुंद्रा कुटुंबाला स्पॉट देखील करण्यात आलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?