AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंकितासोबत लग्न करायचं नव्हतंच…’, विकी जैन – अंकिता लोखंड यांच्या संसारात पुन्हा वादाची ठिणगी?

Ankita Lokhande | 'बिग बॉस 17' शो संपल्यानंतरही अंकिता - विकी यांचे वाद सुरुच, विकी म्हणला, 'अंकितासोबत लग्न करायचं नव्हतंच...', काय आहे प्रकरण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता - विकी यांच्या नात्याची चर्चा...

'अंकितासोबत लग्न करायचं नव्हतंच...',  विकी जैन - अंकिता लोखंड यांच्या संसारात पुन्हा वादाची ठिणगी?
| Updated on: Feb 28, 2024 | 8:23 AM
Share

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकिताचा पती आणि उद्योजक विकी जैन याने मोठा खुलासा केला आहे. मला कधी अंकिता सोबत लग्न करायचं नव्हतं.. असं वक्तव्य विकी याने केलं आहे. ज्यामुळे पुन्हा अंकिता आणि विकी यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत का? अशी चर्चा रंगत आहे. पण असं काहीही नाही. विकी – अंकिता यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्ट अंकिता म्हणाली, ‘विकी म्हणाला होता लग्न होऊ शकत नाही. कारण आमची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती. विकी बिलासपूर येथे राहायचा आणि मुंबईत… विकीला कायम वाटायचं बिलासपूर मुलीसोबतच लग्न केलं पाहिजे…’

अंकिताच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत विकी म्हणाला, ‘अंकिताने काधी मला बोलण्याची संधी दिलीच नाही. त्यामुळे मी काही बोलूच शकलो नाही. मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा अंकिता लग्न करण्याच्या स्थितीत नव्हती आणि मी देखील नव्हतो…’ असं देखील विकी म्हणाला.

विकी – अंकिताच्या लग्नाच्या विरोधात होत्या रंजना जैन

विकीच्या आईला देखील दोघांचं नातं मान्य नव्हतं. रंजना जैन एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, ‘फक्त विकीने अंकितासोबत लग्न केलं आहे. आमचा दोघांच्या नात्याला कायम विरोधच होता. विकीने केलं आहे तर तोच आता निभवेल… आम्हाला काहीही घेणं – देणं नाही… एवढं सगळं पाहून देखील आम्ही त्याला काहीही म्हणालो नाही.’ ‘बिग बॉस 17’ मुळे विकी जैनच्या आई प्रसिद्धी झोतात आल्या. तेव्हा त्यांनी अंकितावर अनेक आरोप केले होतं.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अंकिता – विकी यांची खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. पण शो संपताच दोघांनी नव्याने सुरुवात केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं निधन झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली.

विकी आणि अंकिता यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटात दोघांचं लग्न पार पडलं. सोशल मीडियावर देखील विकी – अंकिता यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.