मलायका अरोरा हिच्यासोबत का नाही राहात मुलगा अरहान खान, सर्वकाही ठिक की…
Malaika Arora | मलायका - अरबाज यांच्या घटस्फोटानंतर आईसोबत का नाही राहात अरहान खान? खान कुटुंबासोबत राहाण्याचा अरहानने का घेतला निर्णय? मलायका आणि अरहान यांच्यामध्ये कसं आहे नातं?

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खान याने 24 डिसेंबर 2023 मध्ये 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजने दुसरा संसार थाटला.
घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका विभक्त झाले आणि दोघांचा मुलगा अरहान याने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, अरहान त्याचं शिक्षण अमेरिकेत पूर्ण करत आहे. पण जेव्हा अरहान आई मलायका हिच्यासोबत न राहाता, वडील आणि खान कुटुंबासोबत राहातो.
आता तर खान कुटुंबात अरबाज याच्या सावत्र आईची देखील एन्ट्री झाली आहे. अरहान याला अनेकदा वडील अरबाज आणि सावत्र आई शुरा यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. अरहान आई मलायका हिच्यासोबत राहात नाही. पण तो मलायका हिला भेटण्यासाठी कायम तिच्या घरी जात असतो.
रिपोर्टनुसार, मलायका हिचं अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेलं नातं अरहान याला आवडत नाही. अरहान कधी अर्जुन याला भेटला देखील नाही. पण सावत्र आईसोबत अरहान याचे चांगले संबंध आहेत. म्हणून अरहान वडील आणि खान कुटुंबासोबत राहतो.
मलायकासोबत अरबाजचा घटस्फोट
एक काळ असा होता जेव्हा अरबाज आणि मलायका चाहत्यांना कपल गोल्स देत होते. 1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सतत होत असलेल्या वादामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरहान याने देखील वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
मलायका आणि अरहान यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. तर दुसरीकडे अरबाद मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करु लागला. पण अरबाज – जॉर्जिया यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. मोठ्या थाटात खान कुटुंबियांनी शुरा हिचं कुटुंबात स्वागत केलं.
