AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुंकणं बंद कर, प्रसिद्धीसाठी तुझं आजारपण वापर..; हिना खानवर भडकली शिल्पा शिंदे

अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात सध्या सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. हिना खानच्या पोस्टनंतर आता शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिनाचं नाव न घेता तिला सुनावलं आहे.

भुंकणं बंद कर, प्रसिद्धीसाठी तुझं आजारपण वापर..; हिना खानवर भडकली शिल्पा शिंदे
Hina Khan and Shilpa ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2026 | 2:01 PM
Share

‘बिग बॉस’च्या वेगवेगळ्या सिझनमधील दोन विजेत्या, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात शिल्पाच्या एका कबुलीने झाली. कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये तिने ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या निर्मात्यांबद्दल धक्कादायक खुलासा केला. मी निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते, अशी कबुली शिल्पाने तब्बल दहा वर्षांनंतर दिली. यावरून हिना खानने तिला घेरलं आणि तिच्यावर जोरदार टीका केली. आता शिल्पाने हिनाला प्रत्युत्तर दिलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा हिनाचं नाव घेत नाही. मात्र तिचा रोख तिच्याकडेच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

“लोक माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवणं कधी बंद करणार? तुम्ही धावत्या ट्रेनमध्ये चढू नका, उगाच मार लागेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमच्याकडे आजारपण आहे, घरातल्या व्यक्तीच्या निधनाचा मुद्दा आहे. मग तुम्हाला शिल्पा शिंदेच का हवी”, असा उपरोधिक सवाल तिने केला आहे. यानंतर शिल्पानं जुन्या कबरी उकरून काढण्याविरोधात इशारा दिला. ती म्हणाली, “जे आता या जगात नाहीत, ते पुरावे देऊ शकत नाहीत. पण मी स्वत: जिवंत असल्याने पुरावे देऊन अनेक गोष्टी सिद्ध करू शकते. गरज पडल्यास मी असे पुरावे देईन की ती त्या व्यक्तीचा तिरस्कार करू लागेल. त्यामुळे काळजी करू नका. मला त्रास देऊ नका. ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहीत नाहीस, त्याबद्दल भुंकणं थांबवा. जर तुम्ही मला तेव्हा पाठिंबा दिला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.” या शिल्पाने या व्हिडीओमध्ये कुठेही त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही.

शिल्पा शिंदेचा व्हिडीओ-

शिल्पाने भारतीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, 2016 मध्ये तिने ‘भाभीजी घर पर हैं’चे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता, पण ते आरोप खोटे होते. यानंतर एका स्वयंसेवी संस्थेनं शिल्पावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर हिना खानने शिल्पाचं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री पूजा बेदीनेही शिल्पाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं