अमृता फडणवीसांच्या आवाजात ‘शिवतांडव स्तोत्र’; अवघ्या काही तासांत व्हिडीओला लाखो व्ह्यूज

| Updated on: Feb 24, 2022 | 3:12 PM

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या आवाजातील या 'शिवतांडव स्तोत्रा'ला ( Shiv Tandav stotram) अवघ्या काही तासांतच युट्यूबवर पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेपाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अमृता फडणवीसांच्या आवाजात शिवतांडव स्तोत्र; अवघ्या काही तासांत व्हिडीओला लाखो व्ह्यूज
Amruta Fadanvis
Follow us on

आपल्या अनोख्या गायनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. अमृता यांच्या आवाजातील ‘शिवतांडव स्तोत्र’ (Shiv Tandav stotram) श्रोतांच्या भेटीला आलं आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडीओला युट्यूबवर पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेपाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवतांडव स्तोत्राला अत्यंत शक्तिशाली शिवस्तोत्र मानलं जातं. महादेवचा कट्टर भक्त असलेल्या रावणाने हे स्तोत्र लिहिलं आहे. महाशिवरात्रीचं औचित्य साधत अमृता फडवणीसांनी त्यांच्या आवाजातील हे शिवतांडव स्तोत्र प्रदर्शित केलं आहे. या शिवतांडव स्तोत्राला शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं असून प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडीओमध्ये भगवी वस्त्रं, रुद्राक्षांची आभूषणं असा अमृता यांचा लूक पहायला मिळतोय.

हे गीत म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी भक्ती, शुद्ध अध्यात्म, देवत्व यांचे परम असे म्हणून त्यांनी त्यांच्या या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अमृता फडणवीस या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी आपली गायनाची आवड स्वतंत्रपणे जपली आहे. याआधीही त्यांनी विविध प्रकारची गाणी चाहत्यांच्या भेटीला आणली आहेत.

अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी राजकीय टिप्पणी असते तर कधी त्यांच्या सांगितिक प्रवासातील वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देत ते असतात. या शिव तांडव स्त्रोत्रमची पोस्ट त्यांनी ज्यावेळी शेअर केली, तेव्हापासून रसिकांना आणि शिवभक्तांना त्याची उत्सुकता लागून राहिली होती. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओ कमेंट करत त्यांच्या गायनकौशल्याचं कौतुक केलं आहे.