अंबानी कुटूंबाची हॅलोविन पार्टी पाहिली का? थोरली सून श्लोकाच्या लूकला सगळे पाहतच राहिले,काळा गाऊन अन् …

अंबानी कुटुंबाची शानदार हॅलोविन पार्टीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या पार्टीत अंबानी यांची थोरली सून श्लोका अंबानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या हटके, ग्लॅमरस काळ्या गाऊनमधील 'मॉर्टीशिया अॅडम्स' लूकने सर्वांनाच थक्क केले. श्लोकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंबानी कुटूंबाची हॅलोविन पार्टी पाहिली का? थोरली सून श्लोकाच्या लूकला सगळे पाहतच राहिले,काळा गाऊन अन् ...
Shloka Ambani Halloween look in black gown at Ambani Halloween party is in the news, video goes viral
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2025 | 6:26 PM

सध्या सर्वत्र हॅलोविन उत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण हॅलोविन पार्टीच्या तयारीत आहेत. अनेक ठिकाणी या पार्टी सुरुही झाल्या आहेत. हॅलोविन पार्टी म्हणजे काय याचा अंदाज बहुकेत सर्वांना आहे. अशीच एक शानदार हॅलोविन पार्टी झाली अंबानी कुटुंबात. नेहमीप्रमाणे, अंबानी कुटुंबाने हॅलोविन मोठ्या उत्साहात साजरा केला. नीता अंबानी, श्लोका अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यासह इतर कलाकारही या पार्टीत उपस्थित राहिले होते. अंबानी यांच्या या हॅलोविन पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. पार्टीतील प्रत्येकाचे लूक खूपच आश्चर्यकारक होते. या पार्टीत अंबानी यांची थोरली सून श्लोका अंबानीच्या लूक मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

श्लोकाचा पूर्णपणे वेगळा लूक दिसला

मुकेश आणि नीता अंबानी यांची मोठी सून, श्लोका, जी तिच्या साधेपणा आणि निरागसतेसाठी ओळखली जाते, ती हॅलोविन पार्टीमध्ये पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसली. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता द एडम्स फैमिली शो के गोमेज एडम्स और मोर्टिसिया एडम्सच्या कॅरेक्टमध्ये म्हणजे त्यांच्या वेषात दिसून आले.

काळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस

श्लोकाने पार्टीमध्ये ब्लॅक लाँग गाऊन घातला होता. फ्लोअर-लेंथ गाऊनमध्ये गोल नेकलाइन आणि फुल स्लीव्ह होते. तिने क्रिस्टल-एनक्रस्टेड स्टॅक्ड ब्रेसलेट घातले होते. तसेच लाल गुलाबांच्या गुच्छाने स्वत:चा लूक पूर्ण केला होता. श्लोकाने तिचे केस मोकळे सोडले होते. श्लोकाने विंग्ड आयलाइनर, काजल, डार्क आयब्रो, मस्कारा, गालांवर ब्लश, शिमरी जांभळा-गुलाबी लिप शेड आणि शीमरी हायलाइटरसह ग्लॅमरस असा मेकअप केला होता. ती या पार्टीमध्ये एक परफेक्ट लूकमध्ये दिसत होती. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

नीता अंबानींचा लुकही चर्चेत 

नीता अंबानी ऑड्रे हेपबर्नचा लूकमध्ये दिसल्या. तर त्यांनी काळ्या रंगाचा ऑफ-द-शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यात डायमंड टियारा, मोत्याचा हार, डायमंड इअररिंग्ज आणि क्रिस्टल बॅग घेतली होती. त्यामुळे त्याही यापार्टीसाठी फरफेक्ट लूकमध्ये दिसत होत्या.


आकाश अंबानीचा हॅलोवीनचा हटके लूक 

दरम्यान, आकाश अंबानीने देखील या पार्टीत हॅलोविन लूकमध्ये दिसला. त्याचा लूकही फार मनोरंजक होता. त्याने काळ्या रंगाचा डबल-ब्रेस्टेड ब्लेझर आणि पांढऱ्या रंगाचा पिनस्ट्राइप-पॅटर्न असलेला पॅन्ट सेट घातला होता. त्याने जॅकेटला चमकदार पांढऱ्या रंगाच्या बटण-डाउन शर्टसह पेयर केले होते. हातात लाकडी काठी आणि मिशा असल्याने तो पूर्णपणे गोमेझ अॅडम्स दिसत होता.

हॅलोवीन पार्टीत आलिया ते दीपिका सर्वांची उपस्थिती

या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ओरीने या हॅलोवीन पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात नीता अंबानी, आकाश आणि श्लोका व्यतिरिक्त आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, नीता अंबानी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि इतर अनेक स्टार्स दिसत आहेत. या सर्वांनी वेगवेगळ्या लूकमध्ये या पार्टीचा आनंद घेतला.