AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या, घरासमोरील गाडी काढ म्हणताच…

एक अतिशय धक्कादाय अशी घटना पुढे आलीये. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची हत्या करण्यात आलीये. अगदी छो्टया वादातून ही हत्या करण्यात आलीये. अभिनेत्रीच्या वहिणीने पोलिसांना अत्यंत मोठी माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या, घरासमोरील गाडी काढ म्हणताच...
Huma Qureshi
| Updated on: Aug 08, 2025 | 7:38 AM
Share

एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसतंय. चक्क एका अभिनेत्रीच्या भावाची पार्किंगच्या वादातून हत्या करण्यात आलीये. स्कूटी पार्किंगवरून वाद झाला आणि थेट हत्या करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची हत्या झालीये. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून हुमाचा भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात झाली. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केलीये.

मिळालेली अधिक माहिती अशी की, निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा स्कूटी घराच्या गेटवरून काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. याच कारणावरून आरोपींनी अभिनेत्रीच्या भावावर हल्ला केला. या हल्ल्यात हुमा कुरेशीचा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा जीव गेला आणि पोलिसांनी त्याला मृत घोषित केले.

हुमा कुरेशीच्या वहिणीने सांगितले की, पार्किंगवरून माझ्या पतीचे आणि शेजाऱ्यांचे भांडणे झाले होते. माझे पती हे ऑफिसवरून घरी आले होते तर आमच्या घरासमोर शेजाऱ्यांची गाडी लावण्यात आली होती. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना स्कूटी येथून काढून इतर ठिकाणी पार्क करण्यास सांगितली.

शेजाऱ्यांनी गाडी काढली नाही आणि माझ्या पतीला घाण घाण शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा वाद इतका टोकाला पोहचला की, त्यांनी थेट हल्ला केला. या हल्ल्यात माझे पती गंभीर जखमी झाले. आम्ही त्यांना रूग्णालयात घेऊन गेलो पण त्यांचा जीव गेला. आता या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर या हत्या प्रकरणाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली.

पोलिसांनी लगेचच कारवाई करत संबंधित आरोपीला लगेचच अटक केलीये. या घटनेचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. या शेजाऱ्यांमध्ये अजून काही वाद आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा आसिफ कुरेशी हा चूलत भाऊ आहे. फक्त गाडी घरासमोरून काढण्यास सांगितल्याने इतका मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक