
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष डेट केल्यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जहीरसोबत लग्न करणार असल्याचे तिने जाहीर करताच लोकांनी तिच्यावर टीका केली. सोनाक्षीचे कुटुंबिय देखील नाराज असल्याचे सांगितले गेले. मात्र, सिव्हील मॅरेजमध्ये सोनाक्षी सही करत असताना तिचे आई आणि वडील तिच्यासोबत खंबीरपणे उभे दिसले. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सोनाक्षीने लग्न केले. लग्नानंतर तिने जय्यत पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. लग्नाच्या पार्टीत धमाल करताना सोनाक्षी दिसली. लग्नानंतर जहीरसोबत चांगला वेळ घालवताना सोनाक्षी दिसते. खास फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.
आता नुकताच सोनाक्षी सिन्हा हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. जहीर इक्बाल याने सोनाक्षीला घराबाहेर काढल्याचे दिसत आहे. जहीर दरवाजा उघडत नसल्याने सोनाक्षी सिन्हा इतकी जास्त वैतागली की, थेट तिचा आवाज ऐकून शेजारी घराबाहेर आले. होय अगदी खरे ऐकले… सोनाक्षी सिन्हा दरवाजा वाजून दमली तरीही जहीर इक्बाल हा दरवाजा उघडत नव्हता. कित्येक तास ती दरवाज्यावर उभी होती.
जहीर हा कॅमेऱ्यातून सोनाक्षी सिन्हा हिची मजा घेत होता. सोनाक्षीने अनेकदा विनंती करूनही त्याने अजिबात म्हणजे अजिबातच दरवाजा उघडला नाही. शेवटी शेजारी घराबाहेर आले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दरवाज्याबाहेर बसवलेल्या कॅमेऱ्यातून सोनाक्षी जहीरला बोलताना दिसत आहे. ती सतत जहीरला फोन करत आहे. मात्र, तरीही जहीर दरवाजा उघडत नाही.
सोनाक्षी सिन्हा हिची अवस्था पाहून जहीरला हसायला येत आहे. नक्की काय सुरू आहे हे पाहण्यासाठी शेजारी देखील बाहेर आले. सोनाक्षी देखील हसताना दिसत आहे. सोनाक्षीसोबत मजा मस्ती करण्यासाठी जहीरने हे केल्याचे दिसत आहे. शेवटी दोघेही हसताना दिसत आहेत. मात्र, सोनाक्षी सिन्हा चांगलीच वैतागली आहे. सोनाक्षी सिन्हासोबत अशाप्रकारची मस्ती करताना अनेकदा जहीर इक्बाल दिसतो. आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.