Wrap Up : प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड सिरीजचे शूटिंग पूर्ण, जाणून घ्या कोणती भूमिका करणार ते

‘सिटाडेल’मध्ये प्रियंका चोप्राची भूमिका काय असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु काही अहवालांनुसार, प्रियंका या प्रोजेक्टमध्ये गुप्तहेर बनून एक विशेष केस सोडवताना दिसणार आहे.

Wrap Up : प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड सिरीजचे शूटिंग पूर्ण, जाणून घ्या कोणती भूमिका करणार ते
प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड सिरीजचे शूटिंग पूर्ण
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 11:17 PM

मुंबई : बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रियांका चोप्रा तिच्या आगामी सिटाडेल या सिरीजबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. ती नेहमी या सिरीजच्या शुटिंगचे क्षण सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. आता या सिरीजबाबत तिने खास पोस्ट शेअर केली असून, तिच्या चाहत्यांना ही पोस्ट खूप आवडली आहे.

रॅप अपची माहिती शेअर केली

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, जेव्हा ही अभिनेत्री एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात आणि आता प्रियंकाने तिच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट ‘सिटाडेल’ रिचर्ड मॅडेनच्या सेटवरून रॅप अपची घोषणा केली आहे. आणि काही BTS फोटोज देखील शेअर करत आपले मोस्ट इंटेंस वर्क म्हटले आहे आणि म्हटले आहे की, ‘हा सिटाडेल रॅप अप आहे. सर्वात इंटेंस वेळेत वर्षभर सर्वात इंटेंस काम. या अद्भुत लोकांशिवाय हे शक्य झाले नसते. आपण काही येथे पाहू शकता, काही नाही.

हे कठीण आहे, परंतु जेव्हा तुम्ही ते पहाल तेव्हा ते ‘वर्थ ​​इट’ दिसेल. या फोटोमध्ये प्रियांकाची तिच्या स्टार्ससोबतची बॉन्डिंग खूपच खास दिसत आहे. त्याचवेळी चाहतेही प्रियांकाच्या या मेहनतीला प्रोत्साहन देत आहेत. खरं तर प्रियंकाने लंडनच्या कडाक्याच्या थंडीत या मालिकेसाठी शूट केले आहे.

सिटाडेलमध्ये प्रियांका साकारतेय गुप्तहेराची भूमिका

‘सिटाडेल’मध्ये प्रियंका चोप्राची भूमिका काय असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु काही अहवालांनुसार, प्रियंका या प्रोजेक्टमध्ये गुप्तहेर बनून एक विशेष केस सोडवताना दिसणार आहे. जिथे ती अॅक्शनमध्ये दिसणार आहे. नुकतेच प्रियांकाला शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या मालिकेचे शूटिंग पूर्ण झाले आहे, त्यामुळे लवकरच त्याची रिलीज डेट अपेक्षित आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका चोप्रा अखेरची बॉलिवूड चित्रपट ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली होती. हॉलिवूड चित्रपट ‘सिटाडेल’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स 4’ व्यतिरिक्त, आलिया भट आणि कतरिना कैफसोबत बॉलिवूड चित्रपट ‘जी ले जरा’ मध्ये काम करताना दिसणार आहे. नुकतेच प्रियांकाने तिच्या नावातून जोनास हे आडनाव काढून टाकले होते तेव्हा चाहत्यांना ती निक जोनासपासून वेगळे होणार की काय अशी चिंता वाटू लागली होती. पण प्रियांकाने अनेक पोस्ट टाकून या वृत्तांचे खंडन केले. (Shooting of Priyanka Chopra’s Hollywood series shooting is over)

इतर बातम्या

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!