Video : सोनाक्षी सिन्हाचा घरात पाय ठेवायलाही नकार, म्हणते जहीरवर विश्वासच नाही; नवऱ्यासोबतच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल या कपलची नेहमीच चर्चा असते. या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये माझा तुझ्यावर विश्वासच नाही, असं सोनाक्षी बोलत आहे.

सिनेसृष्टीत नेमहीचक काहीतरी घडत असतं. या क्षेत्रात काम करणारे अनेक अभिनेते-अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. एकमेकांवर प्रेम झाल्यानंतर अनेक कपल्सने थाटात लग्नही केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने काही कलाकारांचे लग्न शेवटपर्यंत कायम राहू शकले नाही. बॉलिवुडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी लग्नानंतर अवघ्या काही वर्षांत घटस्फोट घेतलेला आहे. तर काही कपल मात्र अजूनही एकमेकांवर काय प्रेम करत असून एकत्र राहतात. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल कपलची तर बॉलिवुडमध्ये नेहमीच चर्चा असते. हे दोघे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करतात. दोघेही सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, सध्या सोनाक्षी सिन्हाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनाक्षीने शेअर केला व्हिडीओ
जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे बॉलिवुडमधील खूपच क्यूट कपल आहे. हे दोघेही सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. हे दोघेही एकमेकांवर खूप सारे प्रँक करतात. विशेष म्हणजे त्यांच्या प्रँकच्या व्हिडीओवर लाखोंनी लाईक्स येतात. सध्या जहीर इक्बालने एक व्हिडीओ शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जहीरने फोन पकडला आहे. तर सोनाक्षी सिन्हा बाहेरून घरात येत आहे.
मी तर तुझे वेलकम करतोय
जहीर सोनाक्षीचे स्वागत करतोय. परंतु सोनाक्षीला त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये. जहीरने काहीतरी प्रँक केलेला आहे, असं तिला वाटतंय. तसेच काहीही प्रँक करू नको, मला तुझ्यावर विश्वास नाही, असंही सोनाक्षी म्हणताना दिसतेय. दुसरीकडे जहीर इक्बाल मात्र मी कोणताही प्रँक केलेला नाही. मी तर तुझे वेलकम करतोय, असे तिला सांगताना दिसतोय. सोनाक्षीचा त्याच्यावर विश्वास नसल्याने जहीर इक्बाल व्हिडीओमध्ये हसत असल्याचे दिसतोय. सोबतच मी घरात येणार नाही, मला तुझ्यावर विश्वासच नाही, असंही सोनाक्षी बोलत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, जहीरने कोणताही प्रँक केलेला नसताना घाबरलेली सोनाक्षी पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हे कपल खूपच क्यूट आहे, असंही त्यांचे चाहते म्हणताना दिसतायत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.
