बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत थिएटरमध्ये दिसली श्रद्धा कपूर; ‘ईठा’ चित्रपटाच्या वादादरम्यान व्हिडिओ व्हायरल

श्रद्धा कपूरचा 'ईठा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच आता श्रद्धा कपूरचा एक थिएटरमधील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत थिएटरमध्ये दिसली श्रद्धा कपूर; ईठा चित्रपटाच्या वादादरम्यान व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Jun 29, 2026 | 3:22 PM

Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, चित्रपटाच्या नावावरून वाद सुरू असतानाच श्रद्धाचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी याच्यासोबत थिएटरमध्ये अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचा आनंद घेताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी थिएटरमध्ये एकत्र बसून चित्रपट पाहताना दिसत आहेत. चित्रपटातील विनोदी प्रसंगांवर श्रद्धा मनमोकळेपणाने हसताना दिसते तर तिच्या शेजारी बसलेला राहुलही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर श्रद्धा कपूरने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याऐवजी तिच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपासून सुरू आहेत रिलेशनशिपच्या चर्चा

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या नात्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चा होत आहे. दोघांना अनेक वेळा डिनर डेट, कौटुंबिक कार्यक्रम आणि खासगी समारंभांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे.

गेल्या वर्षी श्रद्धाने सोशल मीडियावर राहुलसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात ट्विनिंग करताना दिसले होते. त्यानंतर चाहत्यांनी दोघेही आपल्या नात्याबाबत अधिक खुले झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

‘ईठा’ चित्रपटाच्या नावावरून वाद

दरम्यान, श्रद्धा कपूरचा आगामी ‘ईठा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, चित्रपटाच्या शीर्षकावर काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर हा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असेल, तर चित्रपटाच्या नावातही त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असावा. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकात बदल करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us