
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टी फार थाटामाटात साजरी केली जाते. नुकतीच मनीष मल्होत्राचीही दिवाळी पार्टी झाली. त्यानंतर आता रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते. हृतिक रोशन आणि सबा आझादपासून ते सोनाक्षी-झहीरपर्यंत सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र या सर्वांमध्ये व्हिडीओ व्हायरल झाला तो एका अभिनेत्रीचा. ही अभिनेत्री पार्टीत पतीसोबत इतकी रोमँटिक झाली होती कि तिने सर्वांसमोर पतीसोबत लिप लॉक केलं.
दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
ही अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचा पती आंद्रेई कोसचीव सोबत किस करताना दिसत आहे. श्रिया सरन आणि तिचा पती आंद्रेई 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होते. यावेळी दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
सर्वांसमोर अभिनेत्रीने केले पतीसोबत लिप लॉक
मुंबईमध्ये निर्माते रमेश तौराणी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत श्रिया सरन तिचा पती आंद्रेई फारच स्टायलिश लूकमध्ये दिसत होते. या सेलिब्रेशनमध्ये इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. तथापि, दृश्यम अभिनेत्री श्रिया सरनने तिच्या पतीसोबत कॅमेऱ्यासमोर लिप लॉक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पार्टीसाठी श्रियाने नेसलेल्या सोनेरी साडी आणि आकर्षक ब्लाउजमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तर तिच्या पतीने ब्लॅक रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता. या जोडप्याच्या रोमँटिकपणाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
या सेलिब्रिटींची देखील हटक्या अंदाजात एन्ट्री
हृतिक रोशन आणि सबा आझाद हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते, त्यांनी हातात हात घालून स्टायलिश एन्ट्री घेतली. हृतिक काळ्या सॅटिन शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर्समध्ये खूपच सुंदर दिसत होता, तर सबाने सोनेरी-बेज शरारा घातला होता ज्यात तिचे ग्लॅमर नक्कीच दिसत होती. बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक, पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांनीही एकत्र पोज देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुलकितने इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केले होते, तर कृती ऑफ-व्हाइट साडी आणि डीप-नेक डिझायनर ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा तिचा पती झहीर इक्बालसोबत दिसली आणि दोघेही उत्सवी लूकमध्ये होते.