AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांनाही मासिक पाळी यावी तेव्हाच त्यांना कळेल की…, ‘पीरियड लीव्ह’वर श्रुती हासन स्पष्टच म्हणाली…

महिलांना मासिक पाळीत प्रचंड वेदना होतात. पण वेदना होत असल्या तरी महिलांना ऑफिसमध्ये कामासाठी जावचं लागतं... यावर अभिनेत्री श्रृती हासन हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली...

पुरुषांनाही मासिक पाळी यावी तेव्हाच त्यांना कळेल की..., 'पीरियड लीव्ह'वर श्रुती हासन स्पष्टच म्हणाली...
Shruti Haasan
| Updated on: Sep 19, 2026 | 3:37 PM
Share

Shruti Haasan on periods: अभिनेत्री श्रृती हासन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या वेदनेबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. मासिक पाळी दरम्याना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणते, पुरुषांना देखील मासिक पाळी आली पाहिजे आणि त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते… अभिनेत्रीचं हे वक्तव्य विचार करायला लावणारं आहे.

सांगायचं झालं तर, सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारताना श्रुती हासन हिने महिलांच्या आरोग्याविषयी आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणावर भाष्य केलं. पुरुषांना मासिक पाळी आली पाहिजे तेव्हा कामाच्या करारात ‘पीरियड लीव्ह’ किंवा ‘पीरियड हॉलिडे’चा समावेश होईल… असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

श्रृती हासन म्हणाली, ‘मासिक पाळीच्या त्रासावर एकमेव उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे पुरुषांना देखील मासिक पाळी आली पाहिजे. यासाठी मी देवाकडे अनेकदा प्रर्थना केली आहे. जर पुरुषांनाही पीरियड्स आले, तरच आपल्या कामाच्या करारात ‘पीरियड लीव्ह’ किंवा ‘पीरियड हॉलिडे’चा समावेश केला जाईल.’, असं श्रृती म्हणाली.

पुढे सोहा खान सहमती दर्शवत म्हणाली, ‘जर पुरुषांना पाळी आली, तर ते कोणाला अधिक रक्तस्त्राव झाला आहे. आणि कोणाचा टॅम्पॉन मोठा आहे… याचीही एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु करतील…’, सध्यासर्वत्र श्रृती आणि सोहा यांच्या संभाषणाची चर्चा सुरु आहे. मासिक पाळीबद्दल अनेक समज आजही समाजात आहे.

श्रृती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये देखील तिने पदार्पण केलं आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. श्रृती  कायम कोणत्य न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश