शुबमन गिल डिसेंबर महिन्यात अडकणार विवाहबंधनात? ‘या’ अभिनेत्रीने सांगितलं सत्य

Shubman Gill Marriage : शुबमन गिल कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत, आता देखील लग्नामुळे आलाय चर्चेत, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शुबमन गिल डिसेंबर महिन्यात अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीचं सांगितलं सत्य..., सध्या सर्वत्र शुबमन गिल याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

शुबमन  गिल डिसेंबर महिन्यात अडकणार विवाहबंधनात? या अभिनेत्रीने सांगितलं सत्य
Shubman Gill
| Updated on: Jun 01, 2024 | 10:43 AM

भारताचा स्टार क्रिकेटपटू शुबमन गिल फाक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता देखील शुबमन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शुबमन अभिनेत्री रिद्धीमा पंडीत हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर खुद्द रिद्धीमा हिने मौन सोडलं आहे. यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही…

रंगणाऱ्या चर्चांवर रिद्धीमा म्हणाली, ‘माझ्या लग्नाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. मी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार नाही. जेव्हा मी लग्नाचा निर्णय घेईल तेव्हा स्वतः लग्नाची घोषणा करेल. पण आता रंगत असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

रिद्धीमा पंडीत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बहू हमारी रजनीकांत’ ‘खतरा खतरा’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील अभिनेत्री स्पर्धक म्हणून दिसली होती.

सोशल मीडियावर देखील रिद्धीमा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फआर मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

शुबमन गिल याचं खासगी आयुष्य

शुबमन गिल याचं प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील नातं जोडण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण कपिल शर्माच्या शोमध्ये सत्य सांगत सारा हिने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

शुबमन गिल याचं क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर हिच्यासोबत देखील जोडलं जात आहे. दोघांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.