Shweta Tiwari Affairs: 4 अफेअर, 2 लग्न… श्वेता तिवारीच्या नात्यांची Untold Story, भाजप खासदरही लिस्टमध्ये
Shweta Tiwari Affairs: अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेत्रीने 2 लग्न केलीत, पण 4 पुरुषांसोबत देखील श्वेताच्यान नावाची चर्चा रंगली. त्यामध्ये एक भाजप खासदाराचं देखील नाव आहे.

Shweta Tiwari Affairs: ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं, दोघांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. दरम्यान एका मुलाखतीत राजा चौधरी याने श्वेताच्या अफेअरबद्दल मोठा खुलासा केला. श्वेताचे अनेक पुरुषांसोबत अफेअर होते आणि सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असायची… यावर श्वेताने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण जाणून घ्या कोणत्या पुरुषांसोबत अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली, ज्यामध्ये एका भाजप खासदाराचं नाव देखील समिल आहे,
सीजेन खान : “कसौटी जिंदगी की” मालिके श्वेता तिवारी हिने सीजेन याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. मालिके दरम्यान, दोघांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. श्वेता तिवारी हिने या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगून फेटाळून लावल्या असल्या, तरी सीडेन खानने मात्र तिच्यासोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली आणि श्वेताचं वर्णन आपली “पहिली आणि शेवटची चूक” असं केलं.
विशाल आदित्य सिंहल : विशाल याच्यासोबत देखील श्वेता हिच्या नावाच्या चर्चा रंगल्या. विशाल आणि श्वेता यांनी 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बेगुसराय” मालिकेत एकत्र काम केलं. ज्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना देखील उधाण आलं. पण विशाल याने श्वेता हिच्यासोबत रंगत असलेल्या नात्याच्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.
मनोज तिवारी : भाजप खासदारा मनोज तिवारी यांच्यासोबत देखील श्वेताच्या नावाची चर्चा रंगली. श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी यांनी अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नीला मात्र दोघांचं नातं खटकत होतं. कालांतराने मनोज तिवारी आणि पहिली पत्नी राणी यांचा घटस्फोट झाला पण मनोज तिवरी यांच्यासोबत श्वेताची मैत्री आजही कायम आहे.
फहमान खान : स्वतःपेक्षा 10 वर्ष लहान फहमान याच्यासोबत देखील श्वेताचं नाव जोडण्यात आलं. ‘मेरे डैड की दुल्हन’मध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. लॉकडाऊनदरम्यान फहमान खान एका कामासाठी श्वेता तिवारीच्या घरी गेला होता, तेव्हापासून त्यांच्यातील कथित संबंधांच्या चर्चांना सुरुवात झाली. त्याची श्वेतासोबतची भेट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि चाहत्यांमध्ये त्यांच्यातील संबंधांबाबतच्या चर्चांनी जोर धरला.
श्वेता तिवारी हिचे दोन लग्न
श्वेता तिवारी हिचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगी देखली आहे. मुलीच्या जन्मानंतर तर दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर श्वेता आणि राजा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. आजही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.
तर अभिनेत्रीने दुसरं लग्न अभिनव कोहली याच्यासोब केलं. अभिनव आणि श्वेता यांना एक मुलगा देखील आहे. सर्वकाही सुरळीत सुरु असताना, श्वेता हिने दुसऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले. आता श्वेता तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. मुलांसोबत अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.