
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी अनेकदा चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही तिची फिटनेस अनेकांना आश्चर्यचकित करते. तिच्या वयाच्या आकड्याचा तिच्या सौंदर्यावर अजिबात फरक पडत नाही. चाहते तिचे नेहमीच कौतुक करत असतात. तर काहीजण तिला ट्रोल करत असतात. सोशल मीडिया अनेक युजर्स तिला ट्रोल करत असतात याचं कारण म्हणजे तिचं सुंदर दिसण्यामागे तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे असा अनेकांनी आरोप केला आहे.
अनेक अभिनेत्रींप्रमाणे श्वेताने देखील तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट किंवा प्लास्टिक सर्जरी केल्याचं ट्रोलर्सना वाटत असल्याने तिच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र आता या सर्व आरोपांवर आता श्वेता तिवारीने मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे.
‘हे बनावट आहे, ते प्लास्टिक आहे… शेवटी तू कुठे आनंदी आहेस?’
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीने तिच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. ती म्हणाली की, लोकांची मानसिकता समजून घेणे कठीण आहे, कारण ते कोणत्याही परिस्थितीत आनंदी नसतात. श्वेता म्हणाली, “लोकांची समस्या अशी आहे की जर तुम्ही नैसर्गिकरित्या सुंदर दिसत असाल तर ते तुम्हाला शिवीगाळ करतील. ते म्हणतील, ‘हे तुमच्यासाठी वाईट आहे, ते तुमच्यासाठी वाईट आहे.’ ते तुम्हाला ‘तू जाड आहेस,वैगरे अशा अनेक गोष्टींवरून ट्रोल करतच राहतील” असं म्हणत तिने सोशल मीडियाची खरी परिस्थिती सांगितली.
‘हे नकली आहे, हे प्लास्टिक आहे’
ती पुढे म्हणाली की, जरी कोणी काही करून दाखवले तरी लोक त्यांना लक्ष्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. श्वेताच्या म्हणण्यानुसार, “ट्रोलर्सची भूमिका अशी असते की, जर तुम्ही काही करून दाखवले तर ते म्हणतील की हे बनावट आहे, ते बनावट आहे. हे नकली आहे, हे प्लास्टिक आहे. मला समजत नाही की हे लोक कुठे आनंदी असतात. या लोकांना आमच्याशी समस्या काय असते.” असं म्हणत श्वेताने ट्रोल करणाऱ्यांच्या एकंदरीतच स्वभावाबद्दल सांगितले. तसेच याचा तिच्यावर काही परिणाम होत नाही असं तिने म्हटलं आहे.
श्वेताच्या वयाचा अंदाज लावण कठीण आहे
“कसौटी जिंदगी की” या टीव्ही मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून श्वेता तिवारीने घराघरात पोहचली. तेव्हापासून ती प्रेक्षकांची लाकडकी बनली. आज ती मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांश या दोन मुलांची आई असून तिने तिच्या दोन्ही मुलांचा एकट्याने सांभाळ केला आहे. 45 वर्षांची असूनही ती आज तिशीतली वाटते. याबद्दल नक्कीच सगळे तिचे कौतुक करतात. तसेच ती सोशल मीडियावर देखील वारंवार तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यांना पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.