
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमधल्या 'द लीला पॅलेस'मध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थान हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण आहे. परिणीतीच्या आधी याठिकाणी आणखी कोणत्या सेलिब्रिटींनी लग्न केलं, ते पाहुयात..

प्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरीने तिच्या लग्नासाठी राजस्थान ही जागाच निवडली होती. युकेचा गायक रसेल ब्रँडशी तिने 2010 मध्ये रणथंबोरमधील 'अमन आय खास पॅलेस'मध्ये लग्न केलं होतं.

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही राजस्थानमधील जोधपूरमध्ये हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केलं. उमैद भवन याठिकाणी हा लग्नसोहळा पार पडला होता.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलनेही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणांसाठी राजस्थानची निवड केली होती. राजस्थानमधील सवाई माधोपूर फोर्ट रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली.

'दृश्यम 2' फेम अभिनेत्री श्रिया सरन हिने टेनिसपटू अँड्रे कोश्चिव याच्याशी सप्टेंबर 2022 मध्ये लग्न केलं. उदयपूरमधील 17 व्या दशकातील पॅलेसमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

'शेरशाह' चित्रपटातील ऑनस्क्रीन जोडी आणि ऑफस्क्रीन लोकप्रिय कपल कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केलं. या लग्नाला जवळपास 100 पाहुणे उपस्थित होते.

अभिनेत्री रवीना टंडन आणि अनिल यांनी 2004 मध्ये शिव निवास पॅलेसमध्ये लग्न केलं होतं.