Sidharth Malhotra | सिद्धार्थ मल्होत्रा याने मुंबईच्या पावसात असे काही केले की चाहते थेट म्हणाले, कॉपीराईट इश्यू येणार, व्हिडीओ तूफान व्हायरल
सिद्धार्थ मल्होत्रा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे आता लवकर सिद्धार्थ मल्होत्रा याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहर याच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा धमाका करताना दिसेल. सिद्धार्थ मल्होत्रा याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा हा कायमच चर्चेत असणारा बाॅलिवूड अभिनेता आहे. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांचे अत्यंत शाही थाटामध्ये राजस्थान येथे लग्न पार पडले. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सात फेरे घेतले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी लग्न केले. मात्र, यांनी कधीच यांच्या नात्यावर भाष्य केले नव्हते. काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे कियारा अडवाणी हिचा चित्रपट (Movie) कमाईमध्ये देखील धमाका करताना दिसला. परत एकदा कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरली.
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना आवडला असून चाहते हे मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा याचा हा व्हिडीओ मुंबईतील आहे पावसामधील आहे.
सिद्धार्थ मल्होत्राच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो पापाराझी यांना पाहून चक्क शाहरूख खान याची पोझ देतोय. विशेष म्हणजे यावेळी मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. आता सिद्धार्थ मल्होत्रा याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलाय.
View this post on Instagram
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, खरोखरच कियारा अडवाणी ही फार लकी आहे. दुसऱ्याने लिहिले की, मला सिद्धार्थ मल्होत्राचा हा व्हिडीओ आणि त्याचा लूक आवडलाय. तिसऱ्याने लिहिले की, शाहरूख खान हा त्याची पोझ दिल्याने कॉपीराइट करू शकतो. करण जोहर याच्या चित्रपटामध्ये आता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. एका रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा याची 100 कोटींचे संपत्ती आहे. इतकेच नाही तर लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन हे देखील सिद्धार्थ मल्होत्रा याच्याकडे आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा हा एका चित्रपटासाठी तब्बल 4 ते 5 कोटी रूपये घेतो. करण जोहर याच्या योद्धामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा दिसेल.
