सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील कुटुंबियांसोबत दिल्लीहून जैसलमेरकडे रवाना झालाय. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही पध्दतीने विवाह सोहळा पार पडणार आहे.
Feb 04, 2023 | 7:52 PM
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे ६ फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकणार आहेत. यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. कियारा ही कुटुंबियांसोबत मुंबईहून जैसलमेरकडे रवाना झालीये.
1 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील कुटुंबियांसोबत दिल्लीहून जैसलमेरकडे रवाना झालाय. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही पध्दतीने विवाह सोहळा पार पडणार आहे.
2 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा अत्यंत खासगी पध्दतीने जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये होणार आहे. मात्र, विवाह सोहळ्यासाठी पॅलेसमधील स्टाफसह पाहुणे मंडळींना काही नियम हे फाॅलो करावे लागणार आहेत.
3 / 5
रिपोर्टनुसार या शाही विवाह सोहळ्यामध्ये नो फोन पॉलिसी असणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये फोटो किंवा व्हिडीओ हे काढता येणार नाहीत. नो फोन पॉलिसी सर्वांनी फाॅलो करावी, तसेच फोटो किंवा व्हिडीओही शेअर नाही करायचे, अशी विनंती सिद्धार्थ आणि कियाराकडून करण्यात आलीये.
4 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे एकमेकांना डेट करत होते. शेवटी आता हे विवाह बंधणात अडकणार आहेत. अत्यंत शाही पध्दतीने राजस्थानमध्ये यांचा विवाह सोहळा पार पडेल.