AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhu Moosewala: तरुण मुलाला गमावलं, 58 व्या वर्षी आईकडून दुसऱ्या मुलाला जन्म; आता छोट्या भावाकडून हुबेहूब स्टाइलची कॉपी, चाहत्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

Sidhu Moosewala: टोरंटोमधील कॉन्सर्टमध्ये शुभदीपने केलेल्या ‘थापी’मुळे चाहत्यांना पुन्हा एकदा सिद्धूची आठवण झाली. या कार्यक्रमात बोलताना सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेला लढा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगितलं.

Sidhu Moosewala: तरुण मुलाला गमावलं, 58 व्या वर्षी आईकडून दुसऱ्या मुलाला जन्म; आता छोट्या भावाकडून हुबेहूब स्टाइलची कॉपी, चाहत्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
दिवंगत सिद्धू मूसेवाला, त्याचा छोटा भाऊ, आईवडीलImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2026 | 4:13 PM
Share

Sidhu Moosewala: पंजाबी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला आज हयात नसला, तरी त्याची गाणी आणि त्याची खास स्टाइल चाहत्यांच्या मनात कायम आहे. नुकताच कॅनडातील टोरंटो इथं आयोजित एका खास कॉन्सर्टमध्ये सिद्धूचा धाकटा भाऊ शुभदीप सिंग सिद्धू याने त्याची प्रसिद्ध ‘थापी’ स्टाइल करून दाखवली. हा क्षण पाहून उपस्थित चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला, तर सोशल मीडियावरही या व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे ‘थापी’ स्टाइल?

सिद्धू मूसेवालाच्या स्टेजवरील खास अंदाजांपैकी ‘थापी’ हा एक लोकप्रिय हावभाव होता. यात मांडीवर हात मारून त्यानंतर हात वर उचलला जातो. सिद्धूच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि त्याच्या दमदार सादरीकरणाशी हा हावभाव जोडला गेला होता. त्यामुळे त्याच्या धाकट्या भावाने हाच अंदाज साकारल्यावर चाहत्यांना दिवंगत गायकाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. शुभदीपला चाहते प्रेमाने ‘छोटा सिद्धू’ म्हणतात. टोरंटोमधील कार्यक्रमात तो आपल्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता. त्याने भावाची ओळख बनलेली ही स्टाइल करताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमातील काही क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चाहत्यांनी त्यावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा व्हिडीओ-

9 ऑक्टोबर 2026 रोजी टोरंटोमधील स्कॉटियाबँक अरेना इथं ‘साइन्ड टू गॉड होलोग्राम वर्ल्ड टूर’ची सुरुवात झाली. या कार्यक्रमामध्ये 3D होलोग्राम, सिद्धूचा मूळ आवाज, जुने व्हिडीओ आणि स्टेज इफेक्ट्स यांच्या मदतीने त्याच्या सादरीकरणाचा अनुभव पुन्हा निर्माण करण्यात आला. सिद्धूच्या संगीताचा वारसा साजरा करण्यासाठी आयोजित या शोमध्ये त्याच्यासोबत काम केलेले काही कलाकारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला सिद्धूचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर हेदेखील उपस्थित होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला भावनिक महत्त्व प्राप्त झालं. सिद्धूच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात त्याच्या धाकट्या भावाने केलेली ‘थापी’ चाहत्यांसाठी विशेष क्षण ठरली.

या कॉन्सर्टदरम्यान सिद्धू मूसेवालाच्या ‘295’ या लोकप्रिय गाण्याचा नवा म्युझिक व्हिडीओही प्रदर्शित करण्यात आला. या व्हिडीओमध्ये सिद्धूचे जुने फुटेज आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित दृश्यांचा समावेश आहे. जुलै 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

Follow Us
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा