संगीत विश्वाला मोठा धक्का! रस्ते अपघातात प्रसिद्ध गायकाचा मृत्यू

प्रसिद्ध गायक हरमन सिद्धू यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया...

संगीत विश्वाला मोठा धक्का! रस्ते अपघातात प्रसिद्ध गायकाचा मृत्यू
Hraman Sidhu
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 22, 2025 | 7:27 PM

प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 22 नोव्हेंबर, शनिवारी मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला. या अपघातात गायकाचा मृत्यू झाला आहे. हरमन सिद्धूने वयाच्या 37व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. तसेत हरमन सिद्धूचा अपघात कसा झाला? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

पीटीसी न्यूजच्या म्हणण्यानुसार, हा अपघात मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ मानसा-पटियाला रस्त्यावर घडला. हरमन सिद्धूची कार एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार पटली झाली आणि चांगलीच चेपली. अपघाता वेळी हरमन सिद्धू गाडीतच होता. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

हरमन सिद्धूचे कुटुंब

हरमन सिद्धूच्या अकस्मात मृत्यूमुळे चाहते आणि संगीत जगतात शोक व्यक्त केला जात आहे. गायक हरमन सिद्धू हा मिस पूजा यांच्यासोबत ‘कागज या प्यार’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झाला होता. हरमन सिद्धूच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. हरमन सिद्धूचे कपल साँग लोकप्रिय झाले होते. त्याच्या ‘कागज ते प्यार’ या अल्बमने अपार लोकप्रियता मिळवून दिली आणि रोतारात तो प्रसिद्ध झाला होता. मिस पूजासोबतची त्याची जोडी खूप हिट होती. त्याने मिस पूजासोबत अनेक संगीत अल्बममध्ये काम केले होते. त्याची दोन नवी गाणी 2025च्या शेवटी प्रदर्शित होणार होती. हरमन सिद्धू हा जेनझीमध्ये जास्त लोकप्रिय होता.

शूटिंगसाठी गेले होते मानसा

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू हा आपल्या गाण्यांच्या शूटिंगसाठी मानसा येथे गेला होता आणि काम संपल्यानंतर घरी परतत होता. हरमन सिद्धू आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मूलगा होता. पंजाबी संगीत उद्योगाला गेल्या काही महिन्यांत अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. हरमन सिद्धूच्या आधी, राजवीर जवांडा आणि गुरमीत मान यांचाही मृत्यू झाला.