Prashant Tamang Death : मी त्याच्या शेजारीच होते अचानक…. प्रशांत तमांग याच्या मृत्यूसमयी काय घडलं ? पत्नीने सगळंच सांगितलं..
Prashant Tamang : इंडियन आयडॉल 3 चा विजेता, गायक अभिनेता प्रशांत तमांग याचे काल वयाच्या 43 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या अकस्मात निधनाबद्दल चर्चा सुरू आहेत. आता त्यांच्या पत्नीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

Prashant Tamang Death : इंडियन आयडॉल 3 चा विजेता, गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग (Prashant Tamang ) याच्या अकस्मात मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. कार्डिॲक अटॅक अरेस्टने रविवारी त्याच्या मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी त्याने दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर तसेच चाहत्यांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असून चाहतेही शोकमग्न आहे. मात्र प्रशांत तमंग याचा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल विविध चर्चा होताना दिसत आहेत. याच दरम्यान त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया, त्यांचं स्टेटमेंट समोर आलं आहे.
कसा झाला प्रशांतचा मृत्यू ?
प्रशांतचा मृत्यू झाला तेव्हा ते कुटुंबियांसोबतच होते. याप्रकरणी आता त्यांच्या पत्नीने, मार्था एलेने स्टेटमेंट दिलं आहे. वृत्तानुसार, इंडियन आयडल विजेता आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचा मृत्यू नॅचरल, नैसर्गिकच होता , तो झोपेतच गेला, असं त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. ANIशी बोलताना तिने हे विधान केल्याचं समजतं. “हा (प्रशांतचा) नैसर्गिक मृत्यू होता. तो आम्हाला सोडून गेला तेव्हा तो झोपेत होता. मी तेव्हा त्याच्या शेजारीच होते” असं त्या म्हणाल्या. प्रशांतच्या निधनाची बातमी जाहीर झाल्यानंतर मला खूप सपोर्ट मिळतोय, जगभरातून लोकं संपर्क साधायचा प्रयत्न करत आहेत, अनेक जण घराबाहेर जमले आहेत, असं सांगत लोकांचा, चाहत्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं तिने नमूद केलं.”तमांग झोपेत शांतपणे गेला पावला आणि त्यावेळी ती त्याच्यासोबतच होती” असंही तिने सांगितलं. प्रशांत तमांग याच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याचे हजारो- लाखो चाहते शोकाकुल असतानाच, त्याच्या मृत्यूसमयी नेमकं काय घडलं याची माहिती कुटुंबियांकडून पहिल्यांदाच समोर आली आहे.
चाहत्यांना धक्का
इंडियन आयडॉल सीझन 3 जिंकल्यानंतर तमांग हे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि नंतर अभिनयाद्वारे त्याने आपली ओळख वाढवली. पाताल लोकमध्येही त्यांनी भूमिका केली होती. तर गेल्या महिन्यातच त्यांनी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटासाठी देखील शूटिंग केल्याची माहिती समोर आली. तो त्यांचा अखेरचा चित्रपट ठरेल. मात्र प्रशांत तमांग यांच्या जाण्याने चाहते शोकाकुल असून सोशल मीडियावरही प्रतिक्रिया, शोक संदेशाचा पूर आला आहे. प्रशात तमांग यांच्या पत्नीने या प्रेमासाठी, सपोर्टसाठी चाहच्याचे आभार मानले आहेत. ते (चाहते) नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले आहेत. “जगभरातून” त्यांच्या ओळखीच्या आणि न ओळखणाऱ्या लोकांचे फोन येत आहेत आणि हा प्रतिसाद भावनिकदृष्ट्या जबरदस्त आहे, असेही त्यांनी नमूद केलं.
