जावेद अख्तर सारखे बनू नका…गायक लकी अली यांनी का केली अख्तर यांच्यावर टीका

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी हिंदूंना मुसलमानांसारखे न बनण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर गायक लकी अली यांनी जोरदार टीका केली आहे.

जावेद अख्तर सारखे बनू नका...गायक लकी अली यांनी का केली अख्तर यांच्यावर टीका
| Updated on: Oct 22, 2025 | 7:30 PM

बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांवरुन चर्चेत असतात. आता जावेद अख्तर यांनी असे काही वक्तव्य केले आहे की गायक लकी अली यांना ते बिल्कुल पसंत पडले नाही. जावेद अख्तर यांनी हिंदू आणि मुस्लीमाबद्दल एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की हिंदूंना, तुम्ही मुसलमानांसारखे बनू नका, त्याऐवजी त्यांना आपल्या सारखे बनवा. त्यांच्या वक्तव्यावर गायक लकी अली यांनी यथेच्छ टीका केली आहे. काय आहे नेमके प्रकरण पाहूयात…

जावेद अख्तर यांचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला आहे आणि ते मुस्लीम आहेत, वास्तविक जावेद अख्तर स्वत:ला नास्तिक मानतात. ते कोणत्याच धर्माला मानत नाहीत. मात्र त्यांचे म्हणणे असे आहे की ते सर्व धर्मांचा सन्मान करतात. परंतू ते मुस्लीमांबद्दल नेहमी अशी वक्तव्यं करतात ज्यामुळे वाद निर्माण होतो.

जावेद यांच्यावर भडकले लकी अली

लकी अली यांनी सोशल मीडियावर जावेद अख्तर यांच्या विरोधात झोंबरी टीका केली आहे. जावेद अख्तर यांच्या व्हिडीओतील वक्तव्या संदर्भात एका महिला युजरने जावेद यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या महिला युजरला उत्तर देताना लकी अली यांनी लिहीले की, ‘जावेद अख्तर सारखे बनू नका…कधी ओरिजनल राहिले नाहीत आणि खूपच घटिया आहेत..’

जावेद अख्तर काय म्हणाले होते ?

जावेद अख्तर यांचा जो व्हिडीओ चर्चेत आला आहे, तो कोणत्या कार्यक्रमातला आणि कधीचा आहे हे कळलेले नाही. त्यात जावेद अख्तर यांनी चित्रपट ‘शोले’च्या सीनची आठवण काढत म्हटले होते की , शोलेत एक सीन होता. ज्या धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीमागे लपून बोलत असतात आणि हेमा मालिनी यांना वाटते शंकर भोलेनाथ त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आज असा सीन करणे शक्य आहे का ? नाही. मी आज असा सीन लिहीणार नाही. साल 1975 मध्ये हिंदू नव्हते? कोणतेही धार्मिक लोक नव्हते. वास्तविक मी रेकॉर्डवर आहे, मी ही गोष्ट येथे करत नाही. राजू हिराणी आणि मी पुण्यात एका मोठ्या ऑडियन्स समोर होतो. आणि मी म्हणालो, मुसलमानांसारखे बनू नका, त्यांना आपल्या सारखे बनवा. तुम्ही मुसलमानांसारखे बनत आहात ही एक संकट आहे’

येथे पाहा पोस्ट –

कोण आहेत लकी अली?

लकी अली यांचे खरे नाव मकसूद अली आहे. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1958 रोजी मुंबईत झाला होता. लकी बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते कॉमेडियन मेहमूद अली यांचे पूत्र आहेत. लकी यांनी ‘ओ सनम’, ‘जाने क्या ढूंढता है’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘हैरत’ आणि ‘आ भी जा सनम’ सारखी प्रसिद्ध गाणी गायली आहे. त्यांचे अनेक पॉप आल्बम देखील आले आहेत.