Sirf Ek Banda Kafi Hai | सिनेमाची कथा आसाराम बापू यांच्यावर आधारित आहे? लेखकाकडून सत्य समोर

| Updated on: Jun 06, 2023 | 12:13 PM

अभिनेता मनोज बाजपेयी स्टारर 'सिर्फ एक बंदा काफी हैं' आसाराम बापू यांच्यावर आधारित आहे? वादग्रस्त परिस्थितीनंतर सिनेमाच्या लेखकाने सांगितलं सत्य

Sirf Ek Banda Kafi Hai | सिनेमाची कथा आसाराम बापू  यांच्यावर आधारित आहे? लेखकाकडून सत्य समोर
Follow us on

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी स्टारर ‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ (Sirf Ek Bandaa Kafi Hai) सीनेमाची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये देखील सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे सिनेमाच्या कथेमुळे वादग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा आसाराम बापू यांच्यावर आधारित असल्याची चर्चा रंगत असताना आसाराम बापू ट्रस्टकडून सिनेमाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान सिनेमाचे लेखक दिपक किंगरानी यांनी सिनेमाच्या कथेबद्दल सांगितलं आहे. दिपक किंगरानी म्हणाले, ‘सिनेमाची कथा आसाराम बापू यांच्यावर आधारित नसून वकील आणि जोधपूर पोलीस यांच्या उत्तम कामगिरी भोवती सिनेमाची कथा फिरत आहे. त्यांच्या कामाला लक्षात ठेवून सिनेमाची कथा तयार करण्यात आली आहे…’

दिपक किंगरानी पुढे म्हणाले, ‘प्रेक्षकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याची सिनेमाना साकारण्यात आला आहे. सिनेमाच्या माध्यमातून कोणाची प्रतिभा मलिन करण्याचा आणि कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. सिनेमाची कथा एका वकिलाच्या जिद्दी भोवती फिरत आहे. ज्यामध्ये बाबाला जामीन न मिळू देण्यासाठी वकील पूर्ण प्रयत्न करत आहे…’

पुढे दिपक किंगरानी यांना सिनेमातील राजकीय हस्तक्षेपाबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर सिनेमाचे लेखक म्हणाले, ‘सिनेमात कोणत्याही प्रकारची राजकीय बाजू दाखवण्यात आलेली नाही. सिनेमात राजकीय हस्तक्षेप आम्हाला नको होता. ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे, त्यांच्या कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू होता..

‘एका अल्पवयीन मुलगी बाबा विरोधात तक्रार दाखल करते. पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवली आणि वकिलांनी तिला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले… असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सिनेमात फक्त सकारात्मक गोष्टींना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. आम्ही सिनेमाला राजकारणापासून दूर ठेवलं आहे…’ असं देखील सनेमाचे लेखक दिपक किंगरानी म्हणाले आहेत…