Prateik Babbar On Raj Babbar : प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना लग्नात का बोलावलं नाही ? 3 महिन्यांनी केला खुलासा

Prateik Babbar On Raj Babbar: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बरने तीन महिन्यांपूर्वी, 14 फेब्रुवारी रोजी प्रिया बॅनर्जीशी लग्न केले. मात्र या लग्नात त्याने त्याचे वडील अभिनेता राज बब्बर तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणीच उपस्थित नव्हेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चांना तोंड फुटलं. मात्र स्वत:च्या वडिलांनाच लग्नाला का बोलावलं नाही याचा खुलासा आता खुद्द प्रतीनकनेच खुलासा केलाय.

Prateik Babbar On Raj Babbar : प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना लग्नात का बोलावलं नाही ? 3 महिन्यांनी केला खुलासा
वडील राज बब्बर यांना लग्नात का बोलावलं नाही ? प्रतीक बब्बरनेच केला खुलासा
| Updated on: May 12, 2025 | 10:52 AM

Prateik Babbar On Raj Babbar : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा बऱ्याच वेळा चर्चेच्या झोतात असतो. काही महिन्यांपूर्वी (14 फेब्रुवारी) प्रतीकने प्रिया बॅनर्जी हिच्याशी थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. मात्र ते फोटो पाहून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या, कारण या लग्नाला फक्त मोजके कुटुंबीय, मित्र-मैत्रिणीच उपस्थित होते. प्रतीकचे वडील अभिनेते राज ब्बर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीचा या लग्नासाठी आलं नव्हतं, त्यामुळे अनेक चर्चांना तोंड फुटलं.

तसंच प्रतीकचे सावत्र भआऊ-बहीण आर्य बब्बर, जुही बब्बर यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्यावर प्रतीकची पत्नी प्रिया बॅनर्जीनेही पलटवार केला होता. जे लोक आमच्यासाठी महत्त्वाचे होते ते सर्वजण आमच्यासोबत लग्नात उपस्थित होते. कुटुंबातील कोणीही गायब नव्हतं, असं म्हणत प्रियाने त्या चर्चांवर उत्तर दिलं होतं. मात्र इतके दिवस या मुद्यावर शांत असलेल्या प्रतीकने आता स्वत:च खुलासा केला असून लग्नासाठी वडिलांना का बोलावलं नाही तेही स्पष्ट केलंय.

एका मुलाखतीत त्याने याविषयावरही भाष्य केलं. लग्नासाठी वडिलांना निमंत्रण का दिलं नाही, त्याबद्दल तो थेट बोलला. माझे वडील राज आणि सावत्र भाऊ आर्य हे काही परिस्थितीमुळे लग्नासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, पण ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. या निर्णयामागचं कारणही त्याने सांगितलं

या कारणामुळेच वडीलांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण

प्रतीक ब्बर पुढे म्हणाला, ” माझं लग्न आईच्या (स्मिता पाटील) घरात झालं. माझी आई आणि सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यादरम्यानस भूतकाळात जे घडलं, त्यानंतर स्मिता पाटील यांच्या घरी वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावणं (मला) योग्य वाटलं नाही. ” तो म्हणाला, ” भूतकाळात माझे वडील आणि माझी आई यांच्यात (नात्यात) काही कॉम्प्लिकेशन्स होती. मीडियामध्येही बऱ्याच गोष्टी लिहील्या गेल्या, तुम्ही जर 38-40 वर्षांपूर्वीच्या गोष्टी वाचाल तर तुम्हाला समजेल. माझे वडील आणि त्यांच्या कुटुंबियासह दुसरं काही फंक्शन,सेलिब्रेशन करण्याची माझी इच्छा होती. मला असं वाटलं की माझी आई आणि माझ्या बाबांच कुटुंबीय यांच्यात सगळं संपल्यानंतर त्या ( स्मिता पाटील यांच्या) घरात वडील आणि त्यांच्या कुटुंबियांचं येणं योग्य नव्हतं. ते बिलकूल योग्य नव्हतं. जे करणं योग्य होतं तेच आम्ही केलं ” असं प्रतीकने नमूद केलं.

प्रतीकसाठी स्मिता पाटील यांनी खरेदी केलं होतं घर

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक म्हणाला, ” मी काही त्यांचा तिरस्कार करत नाही. पण हे माझ्या आईच्या इच्छेचा सन्मान करण्याबद्ददल होतं. माझे वडील राज बब्बर आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर (लग्नाच्या दिवशी) तिथे नव्हते याचा मला खेद वाटतो. ते त्या घरी येऊ शकले नाहीत. ते (घर) माझ्या आईने माझ्यासाठी खरेदी केलं होतं, मला मोठं करायचं आणि सिंगल मदर म्हणून जीवन जगायचं असा तिचा विचार होता.” असं प्रतीकने नमूद केलं.