AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी-जहीर थोड्याच वेळात अडकणार लग्नबंधनात, रविवारी कोर्ट मॅरेज कसं? काय आहे नियम ?

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Marriage : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल आज विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही झहीरच्या वांद्रे येथील घरी रजिस्टर मॅरेज करणार आहेत. या खास क्षणी कुटुंबिय, मित्र-मैत्रीणींसह अनेक जवळचे लोक त्यांच्यासोबत असतील. दोघांच्या आनंदात कुटुंबीयही सहभागी होतील. पण रविवारी आणि घरी कोर्ट मॅरेज कसे होणार ? काय आहे नियम, ते जाणून घेऊया .

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी-जहीर थोड्याच वेळात अडकणार लग्नबंधनात,  रविवारी कोर्ट मॅरेज कसं? काय आहे नियम ?
Image Credit source: social media
| Updated on: Jun 23, 2024 | 3:51 PM
Share

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रेमकहाणी आज सुफळ संपूर्ण होणार. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाचीवाट बघत होते, अखेर तो आज आलाच आहे. आज 23 जून आहे आणि आजच दोघेही लग्न करणार आहेत. सोनाक्षी आणि झहीर या दोघांचेही धर्म भिन्न आहेत. मात्र त्या दोघांनीही ठरवले आहे की हिंदू किंवा इस्लाम धर्माच्या प्रथा आणि परंपरांनुसार लग्न करणार नाही, तर दोघेही कायद्यासमोर एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतील. म्हणजे दोघेही रजिस्टर मॅरेज करणार आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचं रजिस्टर मॅरेज हे जहीरच्या घरीच होणार आहे. लग्नासाठी सोनाक्षी तिच्या घरातून निघाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. जहीरचं घर वांद्रे येथे आहे. दोघेही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणी, आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत दोघांचे लग्न होणार आहे. अशा परिस्थितीत दोघांनीही धर्म बदलण्याची गरज नाही.

घरीच होऊ शकतं रजिस्टर मॅरेज ?

तज्ज्ञांच्या मते, एखादं जोडपं त्यांच्या घरीही कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी जास्तीत जास्त 60 दिवस आणि लग्नाच्या तारखेच्या किमान 30 दिवस आधी संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. त्यामध्ये त्या जोडप्याला अर्जामध्ये सूचित करावे लागते की त्यांना लग्नाची नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) घरीच पूर्ण करायची आहे. एवढंच नव्हे तर ज्यांचं लग्न आहे, त्या जोडप्याला रविवारी लग्न असेल तर त्यासंबंधीही न्यायालयाला विनंती करावी लागते. यानंतर कोर्टाकडून लग्नाची तारीख देण्यात येते. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर घरच्या घरी लग्न करण्यासाठी जोडप्याला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागते. यानंतर कोर्टाचा ऑफिसर घरी येतो आणि कोर्ट मॅरेजची प्रक्रिया केली जाते. घरात लग्नाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात.

सोनाक्षी-जहीरच्या लग्नानंतर शानदार रिसेप्शन

सोनाक्षी आणि जहीर हे त्यांच्या रजिस्टर लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. मुंबईतील दादर भागातील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचेही रिसेप्शन पार पडणार आहे. हे रेस्टॉरंट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीचे ते असून 48व्या मजल्यावर आहे. या रिसेप्शनसाठी अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, रेखा, संजय लीला भन्साळी, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी असे नामवंत लाकार हजेरी लावणार आहेत. याशिवाय मनीषा कोईराला, सुभाष घई आणि पहलाज निहलानी यांसारखे जवळचे मित्रही रिसेप्शनसाठी उपस्थित राहणार आहेत.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?