सोनाक्षी सिन्हासह सलमान खानच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीचाही ट्विटरला ‘बायबाय’

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर स्टार किड्सवर सडकून टीका झाली. यानंतर अनेकजण ट्विटरला बायबाय करत आहेत. (Sonakshi Sinha and other celebraties quit Twitter).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:29 PM, 21 Jun 2020
सोनाक्षी सिन्हासह सलमान खानच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीचाही ट्विटरला 'बायबाय'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर देशभरातील सशांतचे चाहते न्यायाची मागणी करत आहेत. बॉलिवूडवर परिवारवादाचा आरोपही झाला. तसेच काही मोठ्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी सुशांतचं शोषण केल्याचाही आरोप झाला. यानंतर स्टार किड्सवर देखील सडकून टीका झाली आणि ट्रोलही करण्यात आलं. यात अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे (Sonakshi Sinha and other celebraties quit Twitter).

सध्या दररोजच ट्विटरवर सुशांत सिंह राजपूतच्या नावाने हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. यात सुशांतच्या चाहत्यांसोबतच इतर ट्विटर युजर्सचाही समावेश आहे. ते सर्व सुशांतला न्याय देण्याची मागणी करत आहेत. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील मोठे चेहरे आणि त्यांची मुलं जबाबदार असल्याचाही एक सूर निघतो आहे. यातूनच ट्विटरवर सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यासह अनेकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशास्थितीत अनेक सेलिब्रेटी ट्विटरवरील या ट्रोलिंगपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच सोनाक्षी सिन्हाने ट्विटरला अलविदा केला आहे.

 

View this post on Instagram

 

Aag lage basti mein… mein apni masti mein! Bye Twitter 👋🏼

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on


सोनाक्षी सिन्हाने ट्विट करत आपण ट्विटर सोडत असल्याचं सांगितलं. तिने म्हटलं आहे, “जर मानसिक आरोग्य सांभाळायचं असेल आणि आपला विवेक शाबूत ठेवायचा असेल, तर त्याची पहिली पायही नकारात्मकतेपासून दूर राहणे हीच आहे. सध्या ट्विटरवर इतकी नकारात्मकता कुठेच नाही. त्यामुळेच मी माझं ट्विटरचं खातं बंद करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on


सोनाक्षीनंतर आता सलमान खानची बहिण अर्प‍िताचा पती आयुष शर्मा आणि अभिनेता साकिब सलीम यांनी देखील ट्विटर सोडलं आहे. आयुषनं म्हटलं आहे, की मी इतका वाईट विचार करणाऱ्यांना पाहण्यासाठी ट्विटरवर आलो नव्हतो.

आयुष शर्माने इंस्टाग्रामवर लिहिलं, ‘माणासाविषयी लिहिण्यासाठी 280 शब्द खूपच कमी आहेत. मात्र, 280 शब्द फेक न्यूज, द्वेष, नकारात्मकता पसरवण्यासाठी खूप असतात. मी गर्दीत येऊन वाईट विचार पसरवणाऱ्यांना पाहण्यासाठी ट्विटरवर आलो नव्हतो. खुदा हाफिज.’


एकिकडे आयुष शर्माने कठोर शब्दात लोकांवर टीका करत ट्विटर सोडलं, तर दुसरीकडे साकिब सलीमने ट्विटरला एक पत्र लिहून ट्विटरला रामराम केला. या पत्रात साकिबने लिहिलं, “हाय ट्विटर, जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तु एकदमच जब हम पहली बार मिले तो तुम अप्रतिम होतास. तु भावना व्यक्त करण्यासाठी, इतरांना समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळे दृष्टीकोन लक्षात घेण्यासाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म होतास. मात्र, मागील काही काळापासून तु लोकांसाठी द्वेषाने एकमेकांवर वार करण्याचं माध्यम झाला आहेस. येथे दुसऱ्यांना वाईट बोलणं अगदी सामान्य झालं आहे. माझ्या 99 हजार फॉलोवर्सला धन्यवाद. आपण इतर दुसऱ्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू. मात्र, सध्या तरी माझं आणि ट्विटरचं नातं संपलं आहे. या जगात तुम्ही काहीही बनणार असाल तर दयाळू बना.’

संबंधित बातम्या :

अभिनेता सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणतो…

अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Sonakshi Sinha and other celebraties quit Twitter