अभिनेता सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणतो...

सलमान खानने सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी चाहत्यांमधील वादानंतर प्रतिक्रिया दिली आहे (Salman Khan on Fans war about Sushant Singh Suicide).

अभिनेता सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणतो...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप झाले. यात सलमान खानवरही गंभीर आरोप करण्यात आले. बॉलिवूडमध्ये परिवारवाद असल्याचा आरोपही झाला. दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंहच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर सुशांत सिंह आणि सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालं. आता यावर सलमान खानने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे (Salman Khan on Fans war about Sushant Singh Suicide).

सलमान खान म्हणाला, “माझ्या चाहत्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांच्या पाठिशी उभं राहावं. त्यांनी सध्या सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या भाषेप्रमाणे आणि शिव्याशाप देण्याच्या पद्धतीचा उपयोग करु नये. माझ्या चाहत्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आपली प्रिय व्यक्ती गमावणं खूप त्रासदायक असतं. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला गमावलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत उभे राहा, त्यांना पाठिंबा द्या.”


दिग्दर्शक अभिनव कश्यपने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट करुन सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या निमित्ताने अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली होती. यात त्यांने सलमान खान आणि खान कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप लावले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर सुशांत सिंह आणि सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये ठिणगी पडली. यावर आता सलमान खानने आपली प्रतिक्रिया देत चाहत्यांना समजूतदारपणे वागण्यास सांगितलं आहे.

दिग्दर्शक अभिनव कश्यपचे आरोप नेमके काय?

अभिनव कश्यप होता, “सलमान खानने अरबाज खान आणि सोहेल खानच्या प्रेमापोटी माझं करिअर उध्द्वस्त केलं. दबंग सिनेमानंतर त्याने माझ्यासोबत विश्वासघात केला. सलमानने दबंग 2 चं दिग्दर्शन माझ्याऐवजी अरबाज खानकडे दिलं. त्यानंतर सोहेल आणि अरबाज सातत्याने मला धमक्या देत आले. माझा पुढचा सिनेमा बेशरमला वितरक मिळणार नाही यासाठीही सलमानने फिल्डिंग लावली. मात्र, मी शेवटी जीवावर उदार होऊन रिलायन्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली. खान कुटुंबीयांनी मला खूप मनस्ताप दिला आहे.”

सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

अभिनव कश्यप म्हणाला होता, “मी सरकारला विनंती करतो की त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. सुशांतच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीत आपण रोज अनुभवत असलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कदाचित त्यानेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असेल. मीटू चळवळीप्रमाणेच सुशांतचा मृत्यू हा देखील एका विशाल हिमनगाचं केवळ वरचं टोक असावं, अशी मला भीती आहे. यशराज फिल्म टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात भूमिका केलेली असावी. मात्र, हा तपासाचा विषय आहे. हे लोक कुणाचंही करिअर बनवत नाही, तर ते लोकांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात.”

“मी स्वतः मागील एक दशकापासून हे सर्व अनुभवतो आहे. यावरुन मी अगदी विश्वासाने सांगू शकतो की बॉलिवूडमधील प्रत्येक टॅलेन्ट मॅनेजर आणि एजन्सी कलाकारांसाठी मृत्यूचा सापळा आहे. ते खरंतर सफेद पोशाखातील दलाल आहेत आणि यात सर्वजण सहभागी आहेत. त्यांच्यात अलिखित नियमावली आहे. त्यांचा फक्त एकच मंत्र आहे कुणीही साळसुद नाही, सर्व उघडे आहेत आणि जे उघडे नाहीत, त्यांना उघडं करा. एक जरी पकडला गेला तरी सर्वजण पकडले जातील,” असंही अनुभव कश्यपने म्हटलं होतं.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्याकडे होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली होती.

संबंधित बातम्या :

यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा

Shekhar kapoor on Sushant Suicide | तुझ्या दु:खाची मला जाणीव होती, जबाबदार कोण याचीही मला कल्पना : शेखर कपूर

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Salman Khan on Fans war about Sushant Singh Suicide

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *