अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा

अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत, असं अरबाज खानने सांगितलं.

अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 4:59 PM

मुंबई : दिग्दर्शक अरबाज खानने दिग्दर्शक (Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations) अभिनव कश्यपने सलमान खान आणि खान कुटुंबावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत”, असं अरबाज खानने सांगितलं (Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations).

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे अनेक रहस्य उघड होऊ लागले आहे. बॉलिवूडमधील आतल्या गोष्टी आता पुढे येऊ लागल्या आहेत. दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. तसेच, सलमान खानने त्याच्या भावांसाठी माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप अभिनव कश्यप यांनी केला. मात्र, दिग्दर्शक अरबाज खानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

“दोन वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद झालेला नाही. ‘दंबग-2’ वर आम्ही काम करणार होतो पण काही जुळलं नाही म्हणून आम्ही व्यावसायिकरित्या वेगळे झालो. अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत. त्याने पोस्ट टाकताच आम्ही कायदेशीर पावलं उचलली असून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे”, अशी माहिती अरबाज खानेने दिली.

अभिनवला काय बरळायचं आहे ते बरळू द्या, सलीम खान यांचा अभिनवला टोला 

“अभिनवला काय बरळायचं आहे ते बरळू द्या, तो काय बोलला यावर माझी प्रतिक्रिया देऊन मी अजिबात माझा वेळ फुकट घालवणार नाही”, असा टोला सलीम खान यांनी अभिनव कश्यप यांना लगावला आहे.

Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations

नेमकं प्रकरण काय?

दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंगच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्याने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली. यात त्याने सलमान खान, खान कुटुंब आणि यशराज फिल्म्सवरही गंभीर आरोप लावले. “यशराज फिल्म टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात भूमिका केलेली असावी. मात्र, हा तपासाचा विषय आहे. हे लोक कुणाचंही करिअर बनवत नाही, तर ते लोकांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात”, असा आरोप अभिनव कश्यप यांनी केला होता.

‘सलमान खानने त्याच्या भावांसाठी माझं करिअर उद्ध्वस्त केलं’

अभिनव कश्यप म्हणाला, “सलमान खानने अरबाज खान आणि सोहेल खानच्या प्रेमापोटी माझं करिअर उध्द्वस्त केलं. दबंग सिनेमानंतर त्याने माझ्यासोबत विश्वासघात केला. सलमानने दबंग 2 चं दिग्दर्शन माझ्याऐवजी अरबाज खानकडे दिलं. त्यानंतर सोहेल आणि अरबाज सातत्याने मला धमक्या देत आले. माझा पुढचा सिनेमा बेशरमला वितरक मिळणार नाही यासाठीही सलमानने फिल्डिंग लावली. मात्र, मी शेवटी जीवावर उदार होऊन रिलायन्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली. खान कुटुंबीयांनी मला खूप मनस्ताप दिला आहे.”

बॉलिवूडमध्ये कास्टिंग एजन्सी आणि कास्टिंग डिरेक्टरचं खूप मोठं जाळं आहे. सगळा चित्रपट व्यवसाय कमिशनवर चालतो. आऊटसायडरसाठी हे धोकादायक आहे. कलाकारांचा आत्मविश्वास संपवण्यासाठी हे लोक काम करतात, असाही आरोप त्यांनी केला.

Arbaaz Khan Reaction On Abhinav Kashyaps Allegations

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.