
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टी आता सुरु झाल्या आहेत. नुकतीच मनीष मल्होत्राच्या घरीही दिवाळी पार्टी झाली. त्यानंतर आता रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते. हृतिक रोशन आणि सबा आझादपासून ते सोनाक्षी-झहीरपर्यंत सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती.
सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?
या पार्टीत चर्चा झाली ती बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची. या कार्यक्रमासाठी सोनाक्षी सोनेरी आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या पोशाखात दिसली, ती खूपच सुंदर दिसत होती. पण ती यावेळी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी देखील हेच प्रश्न उपस्थित केले. त्याच अफवांमध्ये आता झहीरने असं काही केलं की सगळे शॉक झाले. सोनाक्षी स्वत: यामुळे गोंधळात पडली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झहीरने सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवत…
सोनाक्षीचा पती आता या अफवांना विनोदी पद्धतीने उत्तर दिले आहे. दोघेही रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला गेले होते, जिथे झहीरने सोनाक्षीच्या पोटाला स्पर्श केला आणि त्याचा बेबी बंप लपवण्याचं नाटक केलं. जेव्हा सोनाक्षीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा ते दोघेही हसले. झहीरने पुन्हा प्रयत्न केला तेव्हा सोनाक्षीने त्याला रोखलं.शेवटी झहीर हसत म्हणाला की या सर्व अफवा आहेत.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
लोक या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, “झहीर खूप मजेदार आहे.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, “त्यांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला.” अजून एकाने लिहिले की “ते खूप गोंडस आणि मजेदार आहेत. ते एकत्र परिपूर्ण आहेत”.
लग्न कधी झालं?
सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 रोजी मुंबईतील बास्टियन येथे लग्न केले, ज्यात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर एक भव्य रिसेप्शन पार पडले. लग्न झाल्यापासून, हे जोडपे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यातील हलकेफुलके आणि भावनिक क्षण शेअर करत असतात.
सोनाक्षीच्या कामाबद्दल
कामाच्या बाबतीत, सोनाक्षी शेवटची “निकिता रॉय” चित्रपटात दिसली होती. ती सध्या “दा-बँग: द टूर रीलोडेड टू कतार” ची तयारी करत आहे. हा भव्य बॉलिवूड कॉन्सर्ट 14 नोव्हेंबर 2025 रोजी दोहा येथील एशियन टाउन अॅम्फीथिएटर येथे होणार आहे, ज्यामध्ये संगीत, नृत्य आणि स्टार-परफॉर्मन्स असणार आहेत.