AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं मुंबईतील आलिशान घर भाड्याने दिलं आहे. विशेष म्हणजे तिचा भाडेकरू कोणी सामान्य व्यक्ती किंवा सेलिब्रिटी नसून थेट कुवेतचे दूतावास आहेत. काऊन्सिल जनरल इमाद अब्दुल अजीज अल खराज हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि स्टाफसोबत या घरात राहणार आहेत.

सोनाक्षी सिन्हाने थेट कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर; भाडं वाचून विस्फारतील डोळे!
Sonakshi Sinha and Zaheer IqbalImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 9:19 AM
Share

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत मुंबईतील तिच्या आलिशान घरची झलक दाखवली आहे. सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असलेलं वांद्रे परिसरातील हे घर आता तिने भाड्याने दिलं आहे. विशेष म्हणजे तिचा भाडेकरू कोणी सर्वसामान्य व्यक्ती किंवा सेलिब्रिटी नाही तर चक्क कुवेतचे दूतावास आहेत. सोनाक्षीने वांद्रे इथलं तिचं आलिशान अपार्टमेंट कुवेत दूतावासांना एका वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिलं आहे. कुवेतचे काऊन्सिल जनरल इमाद अब्दुल अजीज अल-खराज यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. यासाठी ते वर्षाला 1.92 कोटी रुपये मोजत आहेत.

कुवेतच्या दूतावासांना भाड्याने दिलं घर

सोनाक्षीचं हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिम इथल्या ’81 ऑरेट’ नावाच्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 4350 चौरस फूट आहे. हा व्यवहार 25 मे 2026 रोजी नोंदणीकृत झाला असून त्यासाठी 96 हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आलं आहे. या भाडेकराराची सुरुवात 7 जून 2026 रोजी होणार असून 12 महिन्यांसाठी मासिक भाडं 16 रुपये आहे. तर हा करार 6 जून 2027 रोजी संपुष्टात येईल. या अपार्टमेंटसोबत तीन पार्किंग स्लॉटदेखील भाड्याने देण्यात आले आहेत.

इमारतीमधील सुविधा

या इमारतीमध्ये जिम, ग्रंथालय, बैठकीच्या खोल्या, दोन स्विमिंग पुल (एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी), चालण्याचे आणि जॉगिंगचे ट्रॅक, बँक्वेट हॉल, तीन बगीचे, योग स्टुडिओ, ओपन स्काय फिटनेस सेंटर, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि क्लब हाऊस यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे भाडेकरू या सर्व सुविधांचा वापर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय करू शकतात. मुंबईतील कुवेत दूतावास दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील केसी कॉलेजजवळ आहे.

सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘रावडी राठोड’, ‘लुटेरा’, ‘अकिरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. प्रियकर झहीर इक्बालसोबत आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे ती बरीच चर्चेत आली होती. यावरून तिला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे