सोनाक्षी सिन्हा-अनुष्का शर्मा यांच्यात बिनसलं? अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण; नेमकं कारण काय?

आता विराट आणि अनुष्काच्या वृंदावन भेटीचे तसेच स्वामी प्रेमानंद महाराजांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनाक्षीने पुन्हा अनुष्काला अनफॉलो केले आहे. तस दावा सोशल मीडियावर केला जातोय.

सोनाक्षी सिन्हा-अनुष्का शर्मा यांच्यात बिनसलं? अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण; नेमकं कारण काय?
sonakshi sharma and anushka sharma
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 9:54 PM

Sonakshi Sinha And Anushka Sharma : बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असता. या क्षेत्रातील अभिनेता-अभिनेत्रींची प्रेमकरणं तर नेहमीच चर्चेत असतात. कोणता अभिनेता कोणाला डेट करतोय? कोणत्या अभिनेत्रीचे करिअर धोक्यात आले आहे, याबाबतही नेहमीच गॉसिप सुरू असते. विशेष म्हणजे आजकाल आपल्या आवडत्या कलाकारच्या सोशल मीडियावर नेमकं काय चाललंय? याकडेही चांहत्यांचे खास लक्ष असते. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आता तिच्या सोशल मीडियामुळेच आता चर्चेत आली आहे. तिने क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला अनफॉलो केलंय. या फॉलो-अनफॉलोबद्दल वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

सनातन धर्म, अध्यात्म आणि…

रेडिट आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर काही युजर्सनी सोनाक्षी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या फॉलो-अनफॉलो पॅटर्नबाबत वेगवेगळे तर्क मांडले आहेत. सोनाक्षीने अनुष्काला अनफॉलो करण्यामागचे कारण काय असावे, याबाबत उत्सुकता वाढली आहे. रेडिटवरील काही पोस्टनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सनातन धर्म, अध्यात्म आणि धार्मिक प्रवासाशी संबंधित पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केल्यानंतर सोनाक्षीने त्यांना अनफॉलो केलं आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे ही चर्चा केवळ सोशल मीडियावर रंगली आहे.

२०२१ मधील एक प्रसंगही पुन्हा समोर

काही युजर्सनी आणखी एक दावा केला आहे. अनुष्का शर्माने यापूर्वी श्वान आणि श्वानांची काळजी याबात इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. प्राण्यांबद्दल प्रेम असलेल्या सोनाक्षीने ती स्टोरी री-शेअर केली आणि त्यानंतर तिने पुन्हा एकदा अनुष्काला फॉलो केले होते. सोनाक्षी सिन्हाने अनुष्काला अनफॉलो केल्यामुळे २०२१ मधील एक प्रसंगही पुन्हा समोर आला आहे. वेगवान गोलंदाज मोहोम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर विराट कोहली शमीच्या पाठीमागे थांबला होता. त्यावेळी सोनाक्षी सिन्हाने विराटच्या भूमिकेचे जाहीरपणे कौतुक केले होते. त्या काळात ती विराट आणि अनुष्का या दोघांनाही फॉलो करत होती, असा दावा रेडिटवर करण्यात आला आहे.

सोनाक्षीने पुन्हा अनुष्काला अनफॉलो केले

दरम्यान आता विराट आणि अनुष्काच्या वृंदावन भेटीचे तसेच स्वामी प्रेमानंद महाराजांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनाक्षीने पुन्हा अनुष्काला अनफॉलो केले आहे. तस दावा सोशल मीडियावर केला जातोय. पण या फक्त चर्चा आहेत. याबाबत सोनाक्षी किंवा अनुष्का या दोघींनीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us