Sonakshi Sinha – Zaheer Iqbal : एकतर्फी प्रेम, सस्पेन्स आणि थ्रिलचा तडका ! लग्नानंतर सोनाक्षी-जहीर पहिल्यांदा करणार स्क्रीन शेअर, कधी रिलीज ‘तू है मेरी किरण’?

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या 'तू है मेरी किरण' फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एकतर्फी प्रेम, सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपट आहे. कधी रिलीज होणार चित्रपट ?

Sonakshi Sinha - Zaheer Iqbal :  एकतर्फी प्रेम, सस्पेन्स आणि थ्रिलचा तडका ! लग्नानंतर सोनाक्षी-जहीर पहिल्यांदा करणार स्क्रीन शेअर, कधी रिलीज  ‘तू है मेरी किरण’?
| Updated on: Oct 06, 2026 | 5:51 PM

भिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे इंडस्ट्रीतलं चर्चेतलं कपल. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांसोबतची व्हिडीओ, फोटो शेअर करतात. आता मात्र हे जोडपं चक्क मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यांच्या आगामी ‘तू है मेरी किरण’ पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालाय. एकतर्फी प्रेम, सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपट असून या कहाणीत अशी अनेक वळणं, ट्विस्ट येतात, की पडद्यामागे नक्की काय घडतयं, या प्रेक्षक सतत विचार करत राहतात.
‘तू है मेरी किरण’मध्ये सोनाक्षी आणि जहीर यांच्या भूमिकेचे वेगवेगळे पैलूल, वेगळे रंग पहायला मिळतात. मात्र चित्रपटाली मोठं रहस्य मेकर्सनी अजुन गुप्तच ठेवलं आहे.

विशाल राणा आणि इशेलॉन प्रॉडक्शनद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करण रावलने केलं आहे. यात सोनाक्षी किरण नावाच्या तरूणीच्या भूमिकेत दिसली आहे, तर जहीर तिच्यावर खूप प्रेम करत असतो, ती आपली व्हावी ही त्याची मनापासून इच्छा असते, त्यासाठी तो तिच्यावर दबावही टाकत असतो, असं दाखवण्यात आलं आहे.

Loading...

भूमिकेबद्दल काय म्हणाली सोनाक्षी ?

चित्रपटातील आपल्या पात्राबद्दल सोनाक्षी सिन्हा भरभरून बोलली. ‘तू है मेरी किरण ’ ही माझ्यासाठी खूप वेगळ्या प्रकारची फिल्म आहे आणि त्यामुळेच ही माझ्यासाठी खूप रोमांचक ठरली. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, एक सामान्य भावना कशी अधिक गहिरी आणि धोकादायक होत जाते.. माझ्या पात्राचा प्रवास खूप असामान्य आहे आणि त्यात अनेक स्तर आहेत, जे साकार करणं खूपच मनोरंजक ठरलं.. असं सोनाक्षीने नमूद केलं.

पुढे बोलताना सोनाक्षी म्हणाली, “ हा चित्रपट प्रेक्षकांना सतत जखडून ठेवतो आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या घटनांच्या सत्यतेवर प्रश्न उभा करतो. प्रेक्षक या जगाचा भाग व्हावेत आणि सिनेमागृहात त्यांनी ‘तू है मेरी किरण’चा अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे.” असंही ती म्हणाली. ‘तू है मेरी किरण’ हा चित्रपट 23 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

जहीर इक्बालनेही मांडलं मत

दरम्यान, जहीर इक्बालसाठी हा चित्रपट खूप खास आहे. “ या कहाणीमध्ये एकतर्फी प्रेम जसं दाखवलं, त्या गोष्टीन मला खूप जास्त आकर्षित केलं. अशी भावना जी सुरुवातीला खूप गहिरी वाटते, मात्र पुढे जाऊन ती कशी वळण घेते, हे चित्रपटातून दिसतं. या चित्रपटात रहस्य आणि सस्पेन्स सतत कायम असून खरंच काय रहस्य लपलंय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत्ये. मी जे पात्र साकारलं आहे, त्याचे वेगळे लेअर्स समजून घेणं आणि ती भूमिका पडद्यावर साकारणं, माझ्यासाठी खूप खास अनुभव होता ” असंही जहीरने नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us