AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’; ‘सालबर्डी’त सोनाली कुलकर्णीचा धमाकेदार आयटम साँग

'सालबर्डी' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे अशा कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात आता सोनाली कुलकर्णीचा आयटम साँगसुद्धा पहायला मिळणार आहे.

'अप्सरा' बनली 'मंजुळा'; 'सालबर्डी'त सोनाली कुलकर्णीचा धमाकेदार आयटम साँग
Sonalee KulkarniImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2026 | 2:10 PM
Share

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत असलेलं, हे गाणं आनंदी जोशी हिने गायलं आहे.

‘सालबर्डी’ या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून आजवर गुल्हर, बाबो, पाणीपुरी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर रहस्यमय थरारपट रसिकांसाठी आणला आहे. ‘मंजुळा’ या नव्या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला असून ते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. सोनालीच्या या नव्या गाण्यामुळे ‘सालबर्डी’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे.”

View this post on Instagram

A post shared by Digi Social (@digisocial11)

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. आकर्षक कोरिओग्राफी, भन्नाट स्टेप्स आणि झिंग आणणारी सोनालीची एनर्जी यामुळे ही ‘मंजुळा’ प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ