Sonali Bendre : अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांसाठी बोलावणं येताच काय करायची सोनाली बेंद्रे? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Sonali Bendre : बॉलिवूडवर असलेल्या अंडरवर्ल्डच्या दहशतीमुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अंडरवर्ल्डसोबत चर्चा रंगल्यानंतर सिनेमांमध्ये काम मिळणं अभिनेत्रींसाठी कठीण झालेलं. अशात अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांसाठी बोलावणं आल्यानंतर सोनाली काय करायची... याबद्दल स्वतः अभिनेत्रीने सांगितलं आहे.

Sonali Bendre : अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांसाठी बोलावणं येताच काय करायची सोनाली बेंद्रे? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Sonali Bendre
| Updated on: Oct 28, 2026 | 9:04 AM

Sonali Bendre : एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील अन्य गुंडांसोबत जोडलं गेलं. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज त्या अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहेत, पण एकेकाळी त्यांनीच बॉलिवूडवर राज्य केलं होतं. एवढंच नाही. अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांसाठी देखील अनेक सेलिब्रिटी उपस्थित असायचे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देखील अंडरवर्ल्डबद्दल विचारण्यात आलं. ज्यावर अभिनेत्रीने स्पष्ट उत्त दिलं.

मुलाखतीत सोनाली बेंद्रे हिला विचारण्यात आलं की, ‘तुला कधी बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये बोलावलं आहे का?’, या प्रश्नावर उत्तर देत अभिनेत्रीने मोठा खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणाऱ्यांमधली मी कधीच नव्हते… याचं कारण देखील देखील सोनाली हिने यावेळी सांगितलं…

Loading...

सोनाली बेंद्रे म्हणाली, ‘मला कधी बॉलिवूडच्या अंडरवर्ल्डच्या पार्ट्यांसाठी बोलावणं आलं नाही. मी बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणारी नव्हतीच आणि माझ्याकडे तेवढा वेळ देखील नव्हता. मी माझ्या शुटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी मला सुरक्षित वाटलं नाही, त्या ठिकाणी मी कधी गेलेच नाही. दुसरं म्हणजे, त्यावेळी मी साऊथ सिनेमांमध्ये काम करत होती. तर मी सांगायचे माझं साऊथमध्ये शुटिंग आहे. त्यामुळे मी पार्ट्यांपासून कायम बाहेरच राहिले.’, असं सोनली म्हणाली.

सोनाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘हम साथ – साथ है’, ‘सरफरोश’, ‘मेजर साब’, ‘जख्म’, ‘अनाहत’, ‘हमरा दिल आपके पास है’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत सोनाली हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता सोनाली बॉलिवूडमध्या पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कामय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून कामय चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. एवढंच नाही तर, मुलाखतींच्या माध्यमातून सोनाली तिच्या आयुष्यातील चांगले – वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनाली हिचे क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us