AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune MLC Election Result Update : ‘मी कुणालाही नडू शकतो, तुमचे लीडर लेचेपेच’ म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना मिळाली फक्त इतकी मत

Pune MLC Election Result Update : अभिजीत बिचुकले हे पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही निवडणुका लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघातील त्यांचं आव्हान संपलं असलं तरी पुणे पदवीधरमध्ये त्यांचं आव्हान कायम आहे.

Pune MLC Election Result Update : 'मी कुणालाही नडू शकतो, तुमचे लीडर लेचेपेच' म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना मिळाली फक्त इतकी मत
Abhijit bichukale
| Updated on: Oct 28, 2026 | 9:00 AM
Share

सतत विविध मुद्यांवर आक्रमकपणे मतं मांडून चर्चेत राहणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. ते अपक्ष उमेदवार आहेत. ‘मैं खडा तो सरकारसे बडा…’ म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना फक्त 19 मतं मिळाली आहेत. अभिजीत बिचुकले यांनी याआधी सुद्धा वेगवगेळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांची राजकीय महत्वकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. पण प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या वाट्याला पराभवच आलाय. शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मतांचा कोटा ठरलेला असतो. त्यानुसार निकाल लागतो. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीचा मतांचा कोटा ठरला आहे. एकूण 51 हजार 511 मत वैध ठरली ठरली आहेत. शिक्षक मतदार संघासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा ठरला आहे. त्यात अभिजीत बिचुकले यांना फक्त 19 मतं मिळाली. त्यामुळे ते बाद झाले आहेत.

अभिजीत बिचुकले हे पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही निवडणुका लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघातील त्यांचं आव्हान संपलं असलं तरी पुणे पदवीधरमध्ये त्यांचं आव्हान कायम आहे. पुणे शिक्षकमध्ये भाजपच्या कौस्तुभ गावडे 17,600 मतं मिळवून आघाडीवर आहेत. शिंदे शिवसेनेचे सचिन सानप 11,328 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. पुणे पदवीधरमध्ये अभिजीत बिचुकले यांच्या विजयाची दूरदूरपर्यंत शक्यता नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख 1,12,400 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपच्या स्मिता जाधव 1 लाख 2 हजार मतांसह दुसर्‍या स्थानावर आहेत.

विश्वास ठेवला नाही हे मतमोजणीतून दिसतय

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी कुणालाही नडू शकतो, असं अभिजीत बिचुकले प्रचाराच्यावेळी बोललेले. पण कुठल्याही मतदाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही हे मतमोजणीतून दिसतय. निवडणुकीला उभं राहिल्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी पदवीधरांना मोठमोठी आश्वासनं दिलेली.पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंची आघाडी कायम आहे. 17,948 मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर 11,658 आहेत. दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर 10,574 आहेत.

तुमचे लीडर लेचेपेचे

“तुम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागणार नाही. तुमचे लीडर लेचेपेचे आहेत. लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा” असं प्रचाराच्यावेळी अभिजीत बिचुकले म्हणालेले.

Follow Us
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण