वयाच्या 15व्या वर्षी गुपचूप रेड लाइट एरियात जायची ही अभिनेत्री, शूट केला अश्लील सीन; 4 वर्षांत सोडलं बॉलिवूड

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत.

वयाच्या 15व्या वर्षी गुपचूप रेड लाइट एरियात जायची ही अभिनेत्री, शूट केला अश्लील सीन; 4 वर्षांत सोडलं बॉलिवूड
Sonam Khan
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 01, 2025 | 6:07 PM

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनम खान ओळखली जाते. तिने नुकताच सांगितलं की, 1989 मधील ‘मिट्टी और सोना’ या चित्रपटातील तिची भूमिका तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होती. तिने आपल्या ग्लॅमरस प्रतिमेपासून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या चित्रपटात कॉलेज गर्ल आणि तवायफ अशा दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.

सोनम खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘मिट्टी और सोना’ चित्रपटातील तिच्या भूमिकेची काही छायाचित्रे शेअर केली आणि सांगितलं की, वयाच्या अवघ्या 15-16 वर्षी ती रेड लाइट एरियात जाऊन तिथलं आयुष्य जवळून पाहिलं होतं. यामुळे तिला केवळ धैर्य आणि समज मिळालं नाही, तर चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रामाणिकपणे साकारण्यातही मदत झाली.

वाचा: व्हर्जिन बायको शोधू नका.. ती एका रात्रीत संपते; प्रियांका चोप्राचे ते वक्तव्य चर्चेत

सोनम खानने लिहिलं, “‘मिट्टी और सोना’ हा चित्रपट माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे… यात मी कॉलेज गर्ल आणि तवायफ अशा दोन भूमिका साकारल्या. होय, या भूमिका करणं खूपच आव्हानात्मक होतं.” ती पुढे म्हणाली, “मला कॉलेज विद्यार्थिनी आणि वेश्यावृत्तीत अडकलेल्या मुलीच्या वागण्यावर काम करायचं होतं. मी या चित्रपटातून काहीतरी सिद्ध करू इच्छित होते, पण ते कसं सिद्ध होईल, हे त्या वेळी मलाही माहीत नव्हतं.”

सोनम खान पुढे म्हणाली, “लोक मला अनेकदा ‘ग्लॅमरस सोनम’ म्हणून ओळखायचे, जी बिनधास्त बिकिनी घालायची. या चित्रपटाने मला संधी दिली की, माझ्या कमी पण संस्मरणीय 4 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत मी हे सिद्ध करू शकले की मी फक्त ग्लॅमरस नाही, तर उत्तम अभिनयही करू शकते.” ती पुढे म्हणाली, कोणीही ओळखू नये म्हणून गुपचूप रेड लाइट एरियात जायची. तिथे ती त्या मुलींचे वागणे-बोलणे पाहायची. तिने लिहिलं, “मी तिथे काही मुलींशी बोललेही. त्यांच्याशी भेटून मला दु:ख, भीती आणि असुरक्षिततेची भावना जाणवली.” अभिनेत्रीने सांगितलं की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही अनेक घटना घडल्या.

“मला आठवतंय, मला एक दृश्य करायचं होतं, ज्यामध्ये मला स्किन कलरचं शॉर्ट, स्ट्रॅपलेस ड्रेस घालायचं होतं. तो ड्रेस असा होता की जणू मी काहीच घातलं नाही. कॅमेऱ्याच्या लेन्स आणि अँगलसाठी हे दृश्य आवश्यक होतं. सुरुवातीला मी यासाठी तयार होते, पण नंतर मी रडायला लागले आणि त्या दृश्याला नकार दिला. त्या वेळी माझं वय फक्त 15-16 वर्ष होतं. मेकअप रूममध्ये बराच वेळ समजावल्यानंतर मी सेटवर गेले आणि ते दृश्य केलं. मी त्या मुलींकडून हिम्मत गोळा केली, ज्यांना मी काही वर्षांपूर्वी रेड लाइट एरियात पाहिलं होतं.”