
Sonu Nigam: ‘हेच कारण आहे पहलगाममध्ये जे काही झालं त्यासाठी…’, . बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम यांने काही लोकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे गायकावर FIR देखील दाखल करण्यात आला. सोनू निगम यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटक येथील जनतेमध्ये संताप दिसत आहे. वाद टोकाला पोहचल्यानंतर अखेर सोशल मीडियावर एका पोस्ट सोनू निगम यांने माफी मागितली आहे. सध्या गायकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनू निगम सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागत म्हणाला, ‘मला माफ करा कर्नाटक… तुमच्यासाठी माझं प्रेम माझ्या ईगोपेक्षा अधिक आहे… मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो…’ सोनू निगमच्या पोस्टवर आता चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, FIR दाखल झाल्यानंतर देखील सोनू निगम याने घटनेवर स्पष्टीकरण दिलं होतं. एक व्हिडीओ पोस्ट करत गायक म्हणाला, ‘हलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा भाषा विचारली नव्हती. कन्नड लोकं फार चांगली आहे. पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात वाईट लोकं देखील असतात. त्यांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की ते प्रेक्षकांना धमकावून तुम्हाला गाण्यास भाग पाडू शकत नाहीत.’
सांगायचं झालं तर, बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केलं. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘हेच कारण आहे, ज्यामुळे पहलगाम याठिकाणी युद्ध झालं आहे..’ गायकाच्या अशा वक्तव्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.