मी वडिलांना वचन दिलेलं…, CJP आंदोलनावर सोनू निगमने का बाळगलेलं मौन? आता स्वतःचं सांगितलं कारण

CJP आंदोलनाचं फक्त सेलिब्रिटीच नाही तर, राजकीय नेत्यांनी देखील समर्थन केलं. सेलिब्रिटी जंतर - मंतरवर देखील पोहोचलेले. पण गायक सोनू निगम याने यावर मौन बाळगळं होतं. पण आता यावर गायकाने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

मी वडिलांना वचन दिलेलं..., CJP आंदोलनावर सोनू निगमने का बाळगलेलं मौन? आता स्वतःचं सांगितलं कारण
Sonu Nigam
| Updated on: Aug 13, 2026 | 10:36 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी नीट पेपपफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारलं. काही दिवसांत आंदोलनाला देशव्यापी स्वरूप प्राप्त झालं. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल सोनू निगम याला एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. यावर नाराजी व्यक्त करत गायक म्हणालेला, ‘आता बस्स झालं…’, सोनू निगम याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यावर मौन बाळगल्याबद्दल एका गटाने त्याच्यावर टीका केली होती. आता, तेव्हा सोनू निगम याने विषयावर भाष्य करण्यास का नकार दिला, याचं स्पष्टीकरण सोनू निगमने आता दिलं आहे.

सोनू निगमने सांगितलं की, सार्वजनिक कार्यक्रमांमधील चर्चा मुख्य विषयावरच केंद्रित ठेवणं ही एक प्राथमिक शिष्टाचार आहे. मुंबईती तीन दशकांच्या कारकिर्दीत मी एक गोष्ट शिकलो आहे आणि ती म्हणजे, पत्रकार परिषदांमधील चर्चा ही ज्या विशिष्ट विषयासाठी कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, त्याच विषयापुरती मर्यादित असायला हवी, असं गायक म्हणाला.

पंकज उधास यांना श्रद्धांजली की राजनीती?

 सोनू निगम याने सांगितल्यानुसार, ज्या कार्यक्रमात गायकाला ‘नीट’ (NEET) प्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली, तो कार्यक्रम दिवंगत गझल गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. अशा प्रसंगी राजकारण किंवा तत्सम विषयांवर चर्चा करणं सोनू निगम याला योग्य वाटले नाही. त्याचप्रमाणे, ज्या विषयांची पुरेशी माहिती नाही अशा विषयांवर सार्वजनिकरीत्या भाष्य न करण्याचं वचन आपल्या वडिलांना दिलं होतं, असंही तिने नमूद केलं.

‘आयुष्यात अनेकदा स्टँड घेतले आहेत…

सोनू निगन याने असं देखील सांगितलं की, तो प्रत्येक मुद्द्यावर मैन साधणारा कलाकार नाही. गायकाने सांगितल्यानुसार, त्याने अनेक मुद्द्यावर स्टँड घेतले आहेत. गायकाने विशेषतः धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा वापर आणि कलाकारांचे रॉयल्टी हक्क यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यानं नमूद केलं की, अनेक प्रसंगी त्याने एकट्यानेच आवाज उठवला आणि व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आता त्याची अशी इच्छा आहे की, इतरांनीही आवाज उठवावा आणि ते काय बदल घडवून आणू शकतात, हे पहावं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us