Sonu Sood | सोनू सूदच्या नावे तुम्हालाही आलीय का 5 लाखांच्या कर्जाची ऑफर? जाणून घ्या या मागची सत्यता…

| Updated on: Mar 05, 2021 | 1:31 PM

सोनू सूदच्या नावाचा बनावट संदेशही प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात सोनू सूद ट्रस्टकडून ‘हे’ कर्ज देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Sonu Sood | सोनू सूदच्या नावे तुम्हालाही आलीय का 5 लाखांच्या कर्जाची ऑफर? जाणून घ्या या मागची सत्यता...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : ऑनलाईन बँकिंगचा जितका अधिक फायदा झाला, आता तितकाच अधिक धोकाही वाढला आहे. सध्या ऑनलाईन फसवणूकही लक्षणीय वाढली आहे. आता हे गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब करून लोकांकडून पैसे लुटत आहेत. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात दुसर्‍या व्यक्तीच्या किंवा ट्रस्टच्या नावावर पैशाची मागणी करण्यात आली आहे. तर, बर्‍याच घटनांमध्ये लोक कर्ज किंवा कोणतीही आकर्षक ऑफर देऊन फसवणूक करत आहेत. या प्रकरणात आता अभिनेता सोनू सूद (sonu sood) याचे नाव घेऊनही लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे (Sonu Sood gives clarification on twitter about 5 lakh loan viral message).

खरं तर, कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात सोनू सूदने स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी अनेक परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले. यानंतर, कलाकार गरजू लोकांना त्यांच्या उपचार, अभ्यास आणि इतर कामात मदत केली. तेव्हापासून या अभिनेत्याला ‘मसीहा’ अशी ओळख मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सोनू सूदकडून बऱ्याच लोकांनी मदत घेतली आहे.

या सगळ्यादरम्यान, सोनू सूदच्या नावाचा बनावट संदेशही प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात सोनू सूद ट्रस्टकडून ‘हे’ कर्ज देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, सोनू सूदची ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’ नावाची एक विश्वस्त संस्था आहे, जी लोकांना मदत करते. आता या फाऊंडेशनच्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे, ज्यांची माहिती स्वत: सोनू सूद यांनी दिली आहे. सोनूने आपल्या ट्विटर हँडलवर या बातमीला चुकीचे असल्याचे अर्थात अफवा असल्याचे म्हटले आहे.

सोनूचे ट्वीट

कशी केली जात होती फसवणूक?

वास्तविक, एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो सोनू सूद फाउंडेशनने दिलेल्या पत्रासारखा दिसत आहे. त्यात, या फाऊंडेशनकडून प्रत्येकाला 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. यासह हे कर्ज देण्यासाठी 3500 रुपये कायदेशीर शुल्क म्हणून मागितले जात आहेत. स्वतः सोनू सूद यांनी ट्विटरवर या वृत्ताचे खंडन केले आहे (Sonu Sood gives clarification on twitter about 5 lakh loan viral message).

काय आहे यामागचे सत्य?

सोनू सूद यांनी ट्विट करुन माहिती दिली असून, सूद चॅरिटी फाउंडेशनकडून असे कोणतेही कर्ज दिले जात नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात, लोकांनी सावध राहावे, असे आवाहनही केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘सूद चॅरिटी फाउंडेशन कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही. अशा घोटाळे आणि फसवणूकीपासून दूर रहा. त्यामध्ये दिलेला संपर्क क्रमांकही चुकीचा आहे. धन्यवाद.’

यापूर्वीही सोनू सूद यांनी अशी माहिती अनेकदा दिली आहे की, कोणीही आमच्या नावाने पैसे मागत असल्यास ते देऊ नयेत आणि जो कोणी अशी मागणी करेल त्यांच्यापासून दूर रहावे. अगदी ट्विटर अकाऊंटच्या कव्हर फोटोवरही त्याने अशीच माहिती दिली आहे आणि लिहिले आहे की, आमची सेवा नि:शुल्क आहे. त्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये.

अशाप्रकारचा मेसेज तुम्हालाही आला असेल, तर सोनू सूदच्या नावावर कोणालाही पैसे पाठवू नका. जर आपल्याला कर्ज हवे असेल, तर आपण रीतसर बँकेशी संपर्क साधावा आणि आपल्या कागदपत्रांनुसार बँक कर्जाची मागणी करा, अशा संदेशांवर अजिबात लक्ष देऊ नका.

(Sonu Sood gives clarification on twitter about 5 lakh loan viral message)

हेही वाचा :

Marathi Movie | नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार ‘झिम्मा’, अनलॉकनंतर प्रदर्शित होणार मराठीतला ‘मोठा’ सिनेमा!

तैमुर, दीपिका, कतरिनाला विसरा! आता बाजारात आलीय बिग बॉसच्या ‘या’ अभिनेत्रीची बाहुली!